agriculture news in marathi, fodder shortage in jalgaon, maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात कडब्याचा तुटवडा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 डिसेंबर 2017
पशुखाद्याचे दर स्थिर आहे. कडबा मिळणे दुरापास्त झाले असून, आम्हाला हिरव्या चाऱ्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यासाठी आम्ही हिरव्या चाऱ्यासाठी क्षेत्र राखीव ठेवले असून, त्यात बारमाही चारा घेतो. त्यामुळे फारशी अडचण येत नाही. 
- अमोल जाधव, पशुधनपालक, जळगाव
जळगाव : यंदाच्या खरिपात ज्वारी, बाजरीचे उत्पादन व कडबा हवा तसा आला नाही. तसेच सध्या मागील रब्बीमधील दादरचा कडबा व कुट्टी मिळणे दुरापास्त झाले आहे. कडब्याचा तुटवडा जाणवत असून, यामुळे त्याची दरवाढ झाल्याचे चित्र आहे. दादरची कुट्टी तर ४२०० रुपये प्रतिशेकडा या दराने मिळू लागली आहे.
 
कडब्यासह पशुखाद्याचे दर वाढल्याने दूध उत्पादकांचा उत्पादन खर्च वाढला आहे. मक्‍याचा चाराही पुरेसा नाही. येथील बाजार समितीच्या पशुधन बाजारानजीक कडबा व कुट्टी विक्रेते आहेत. मका, ज्वारी आणि दादरची कुट्टी या विक्रेत्यांकडे मिळते. परंतु त्यात दादरची १०० पेंढ्यांची कुट्टी ४२०० रुपयांपेक्षा अधिक दरात मिळत आहे.मक्‍याची १०० पेंढ्यांची जुनी कुट्टी १८०० रुपयांपेक्षा अधिक दरात मिळत असल्याची माहिती मिळाली.
 
जुनी व नवी ज्वारीची कुट्टी देखील मिळणे दुरापास्त झाले आहे. रावेर, यावल, चोपडा, जामनेर व पाचोरा येथील काही भागात ज्वारीचे पीक बरे आले. परंतु संबंधित शेतकऱ्यांनी हा चारा न विकता तो आपल्या पशुधनासाठी साठविला आहे. त्यामुळे ज्वारीचा कडबा बाजारात फारसा आलेला नाही. सोयाबीन काढणीतून येणारा भुसाही आता संपत आला आहे. तुरीचा कोरडा पाला अजून यायला सुरवात झालेली नाही. तर माळरानातील किंवा शेताच्या बांधावरील गवतही संपले आहे. नवा चारा येण्यास अजून दोन ते अडीच महिने कालावधी आहे. 
 
सध्या सरकी ढेपचे दर १३५० ते १४०० रुपये प्रति ७० किलो आहेत. मध्यंतरी पशुखाद्याचे दर आवाक्‍यात होते, परंतु कपाशीचे दर वाढल्याने सरकी ढेपचे दर स्थिर आहेत. तसेच इतर पशुखाद्याचे दरही स्थिरच असल्याची माहिती मिळाली. 

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...
...कृत्रिम पावसाचीही तयारी !सोलापूर  : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...
आरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...
राज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई  : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...
शेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर  : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...
अंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली  : वाढती उष्णतेची झळ...
व्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक  : अंदरसूल येथील कांदा...
'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर  ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...
दुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर  : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...
चंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर  ः काजूच्या...
पुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे  ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...
नांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड :  नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर  : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...
उभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...
‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...
हिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली  : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...
राष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...
भाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...