agriculture news in marathi, fodder shortage in pune district, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात चाराटंचाई
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर जानेवारीपर्यंत जनावरांना हिरवा चारा उपलब्ध असतो. यंदा पावसाअभावी चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आतापासून चाऱ्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे जनावरे सांभाळणे खर्चिक झाले असून, मिळेल त्या किमतीत शेतकरी जनावरांची विक्री करत आहेत.
- भाऊसाहेब पळसकर, करडे, ता. शिरूर, जि. पुणे.

पुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांसमोर चाराटंचाईचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे जनावरांची कमी दराने विक्री होत असल्याचे चित्र आहे.

यंदा हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. परंतु प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड पडल्याने खरीप पिके वाया गेली. पश्चिम पट्ट्यात झालेल्या पावसामुळे धरणे भरली असली, तरी त्याचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी अधिक होणार आहे. त्यामुळे शेतीसाठी धरणातून पाणी कमी प्रमाणात उपलब्ध होईल. परतीचा पाऊस झाल्यास जानेवारीपर्यंत हिरवा चारा उपलब्ध असतो. मात्र, यंदा पावसाच्या खंडामुळे सुरवातीपासून चारापिकांचे प्रमाण अत्यंत कमी राहिले आहे. पावसावर उगवलेला चाराही आता वाळू लागला आहे. त्यामुळे येत्या काळात जनावरांच्या चारा-पाण्याची सोय कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. यंदा जिल्ह्यात पाणीटंचाईबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनणार असल्याचे चित्र आहे.  

पावसाअभावी चारा उपलब्ध नसल्याने दुभत्या जनावरांसह बैलजोडीसाठी चाऱ्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्याने शेतकरी जनावरांची विक्री करत आहे. सध्या बाजारात जनावरांची कमी दराने विक्री होत असून, ५० ते ६० हजार रुपये किमतीच्या बैलजोडीची मागणी ३० ते ४० हजारांत व्यापाऱ्यांकडून होत आहे. गाय, म्हैस यांसारख्या दुभत्या जनावरांच्या दराचीही अशीच काहीशी परिस्थिती आहे.

पावसाळा संपल्यानंतर शेतकऱ्यांना जूनपर्यंत जनावरांसाठी सुक्या चाऱ्यांची सोय करावी लागते. यंदा बाजरीच्या कडब्यालाही हजार ते बाराशे रुपये शेकडा एवढा भाव आला आहे. ज्वारी कडब्याचा दर तीन ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत वाढला आहे. पावसाअभावी शेतीमालातून केलेला खर्चही निघू न शकल्याने जनावरांच्या चाऱ्यासाठी पैसा आणायचा कोठून असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...