भाजीपाला उत्पादकांचा धुक्‍यात घुसमटतोय श्‍वास

भाजीपाला उत्पादकांचा धुक्‍यात घुसमटतोय श्‍वास

कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांत भाजीपाल्याचे दर कोसळल्याने संकटात असलेल्या दक्षिण महाराष्ट्रातील भाजीपाला उत्पादकांपुढे आता धुक्‍याने आव्हान "गडद" केले आहे. अतिशय दाट असणाऱ्या धुक्‍यांमुळे फुलोऱ्याच्या अवस्थेत असणाऱ्या सर्वच भाजीपाल्याची फुलगळ होत आहे. पिकाची वाढच थांबली आहे. यामुळे भाजीपाल्याचे उत्पादनच धोक्‍यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून ही स्थिती उदभवली आहे .

हवामान बदल, घसरलेले दर परीक्षा पाहणारे गेल्या तीन महिन्यांतील बदलते हवामान भाजीपाला उत्पादकांची परीक्षा पहाणारे ठरत आहे. ऑक्‍टोंबरमध्ये जोरदार झालेल्या परतीच्या पावसाने भाजीपाला शिवाराला तळ्याचे स्वरुप आले. पालेभाज्या कुजून गेल्या. तर फळभाज्या काढता न आल्याने पक्व झालेली फळेही गळून गेली. भाजीपाल्याची टंचाई निर्माण झाल्याने दरात प्रचंड वाढ झाली. पण दुर्दैवाने याचा लाभ शेतकऱ्यांना झाला नाही. परतीचा पाऊस थांबल्यानंतरही काही काळ दर तेजीतच होते. वाफसा आल्यानंतर शेतकऱ्यांनी दुसरा भाजीपाला लावला. पण त्याचे उत्पादन सुरू झाल्यानंतर दरात मोठी घसरण झाली. याचा फटका पुन्हा उत्पादकांना बसला

उत्पादक हबकले दक्षिण महाराष्ट्रातील भाजीपाला उत्पादकांची अनेक पिके फुलोऱ्याच्या अवस्थेत आहेत. मध्यंतरी काही काळ ढगाळ हवामान निर्माण झाले. त्यानंतर स्वच्छ उन पडले. या वातावरणाने थोडासा दिलासा मिळाला. पण परंतु गेल्या चार दिवसांत पुन्हा गडद धुक्‍याची छाया शिवारावर पसरल्याने आता भाजीपाला उत्पादक पुन्हा चक्रव्यूहात अडकला आहे. फुलगळ झाली. परिणामी वाढ खुंटली. आता करायचे काय या विचाराने भाजीपाला उत्पादक हबकला आहे.

गेल्या चार दिवसांपासून माझ्याकडच्या वरणा, वांगी, आदी भाजीपाल्याची फुलगळ होत आहे. फुलगळ आणि मोहोर जळत असल्याने चिंता वाढली आहे. दररोज पडणारे धुके आमच्या नुकसानीत भर टाकत आहे. - रमेश जाधव , येलूर, जि. सांगली

धुके म्हणजे गरम वाफच असते. ते जर सातत्याने पडू लागले तर फुलगळ तर होतेच. पण कोवळी पानेही झडून जातात. चयापचयाच्या क्रिया थांबतात. याचा विपरीत परिणाम सर्वच भाजीपाल्यांवर होतो. पाणी साचून राहिल्याने बुरशीजन्य रोग येतात. यातून पिके वाचविण्याकरिता शिवाराभोवतीचा कचरा जाळून धुक्‍याची तीव्रता कमी करावी, अथवा पाण्यात निचरा होणारे गंधक द्यावे. - डी. आर. पाटगावकर , सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com