agriculture news in Marathi, food ministry demands to hike sugar import duty to 90 percents, Maharashtra | Agrowon

साखर आयात शुल्क ९० टक्क्यांपर्यंत वाढवा
कोजेन्सिस वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली ः देशात साखरेचे पडलेले दर आणि विदेशातून अनुदानित होणाऱ्या आयातीची शक्यता यामुळे आयात शुल्क वाढविण्याची गरज आहे. सध्या साखर आयातीवर ५० टक्के शुल्क आहे. हे शुल्क वाढवून ८० ते ९० टक्क्यांपर्यंत वाढवावे, अशी मागणी अन्न मंत्रालय देशाच्या अर्थ मंत्रालयाकडे करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

नवी दिल्ली ः देशात साखरेचे पडलेले दर आणि विदेशातून अनुदानित होणाऱ्या आयातीची शक्यता यामुळे आयात शुल्क वाढविण्याची गरज आहे. सध्या साखर आयातीवर ५० टक्के शुल्क आहे. हे शुल्क वाढवून ८० ते ९० टक्क्यांपर्यंत वाढवावे, अशी मागणी अन्न मंत्रालय देशाच्या अर्थ मंत्रालयाकडे करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

‘‘सध्या देशातील साखर दराची आणि उद्योगाची स्थिती पाहता आयात शुल्क वाढीची मागणी केली जाणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव येत्या एक ते दोन दिवसांत अर्थ विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर अर्थ मंत्रालयाने यासंबंधी योग्य ती भूमिका घ्यावी. सद्यःस्थितीचा विचार करून योग्य ती आयात शुल्काची पातळी अर्थ विभागाने ठरवावी,’’ असे अन्न मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. 

अलीकडेच पाकिस्तनाने अनुदान दिलेली १.५ दशलक्ष टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ही साखर भारतातच येण्याची दाट शक्यता असल्याने व्यापारी आणि साखर उद्योगाने चिंता व्यक्त केली आहे. आधीच देशात साखरेचे दर कमी झाले आणि त्यातच जर पाकिस्तनाची अनुदानित साखर आयात झाली तर परिस्थिती आणखी बिघडू शकते. त्यामुळे साखर आयात शुल्क ५० टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत वाढवावे, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली होती.  

पाकिस्तानची साखर रोखण्यासाठी शुल्कवाढ 
वर्षाच्या सुरवातीला पाकिस्तानने १.५ दशलक्ष टन साखर अनुदान देऊन निर्यातीची परवानगी दिली होती. या साखरेला पाकिस्तानने प्रतिकिलो १०.७० पाकिस्तानी रुपये (१ पाकिस्तानी रुपया = ०.६१ रुपये) अनुदान दिले आहे. ‘‘आम्ही देशातील साखर व्यापाराच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहोत. सध्या पाकिस्तानातून साखर आयातीचीच शक्यता आहे. ८० टक्क्यांपेक्षा कमी शुल्क असल्यास पाकिस्तानमधून आयातीच्या हालचाली होऊ शकतात. त्यामुळे आम्ही साखरेचे आयात शुल्क ८० ते ९० टक्क्यांपर्यंत वाढविण्याची मागणी अर्थ मंत्रालयाकडे केली आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पाकिस्तानात अतिरिक्त उत्पादन
याआधी ४ डिसेंबर २०१७ ला पाकिस्तानमधील सिंध राज्य सरकारने शिल्लक असलेली साखर निर्यातीसाठी ९.३० पाकिस्तानी रुपये अतिरिक्त अनुदान देण्याचे ठरविले होते. पाकिस्तानने चालू गाळप हंगामात ८ दशलक्ष टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे आणि देशात ५ दशलक्ष टन साखर उपभोग होतो. त्यामुळे अतिरिक्त साखर शिल्लक राहत असल्याने अनुदान देऊन साखर निर्यातीची पाकिस्तानची धडपड सुरू आहे.

इतर अॅग्रो विशेष
चढ्या दराचा फायदा कोणाला?मागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....
अतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला? या एका प्रश्नाला अनेक...
निफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक  ः तालुक्‍यातील उगाव,...
पशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर   ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...
ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...
राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद :  राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...
दराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
अर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...
राज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
धान उत्पादकांना बोनस कधी?नागपूर : लगतच्या छत्तीसगड राज्याच्या तुलनेत...
उत्तर भारतात थंडी कायमश्रीनगर : जम्मू-काश्‍मीर, पंजाब, हरियाना व हिमाचल...
राज्यात थंडी झाली कमीपुणे : राज्यात अपवाद वगळता सर्वच ठिकाणच्या किमान...
बांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’ण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे...
आधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास संपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग...