agriculture news in marathi, Food Processing industries to get government benefits say Agri Minister Fhunkar | Agrowon

अन्न प्रक्रिया उद्योगाला सवलती जाहीर : कृषिमंत्री फुंडकर
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

मुंबई : कृषी अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी राज्याने जाहीर केलेल्या अन्न प्रक्रिया धोरणाला पूरक अशा सवलती देण्याबाबतचे निर्णय महसूल आणि जलसंपदा विभागाने घेतले आहेत. यामुळे अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी गती मिळणार असल्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले.

मुंबई : कृषी अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी राज्याने जाहीर केलेल्या अन्न प्रक्रिया धोरणाला पूरक अशा सवलती देण्याबाबतचे निर्णय महसूल आणि जलसंपदा विभागाने घेतले आहेत. यामुळे अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी गती मिळणार असल्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले.

कृषी विभागातर्फे ऑक्टोबर २०१७ मध्ये अन्न प्रक्रिया धोरण लागू करण्यात आले. त्यामध्ये अन्न प्रक्रिया उद्योगास अकृषिक परवानगी देण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. या अनुषंगाने महसूल विभागाने नुकतीच अधिसूचना जारी करत कुठल्याही सूक्ष्म, लघू आणि मध्यम अन्न प्रक्रिया औद्योगिक घटकांसाठी केला जाणारा जमिनीचा वापर हा शेतीच्या प्रयोजनासाठी केलेल्या जाणाऱ्या जमिनीचा वापर असे मानण्यात येईल, अशा प्रकारची सुधारणा करत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

याच अन्न प्रक्रिया धोरणात उद्योगांना पाणी उपसा परवाना घेण्याबाबतची तरतूद आहे. त्या अनुषंगाने जलसंपदा विभागाने शेतीमालावर आधारित सूक्ष्म, लघू व मध्यम अन्न प्रक्रिया उद्योगांना लागणाऱ्या पाण्याकरिता मानवी पाणी आरक्षणाबाबतची कार्यपद्धती केली आहे. त्यासाठी अशा अन्न प्रक्रिया उद्योगांना जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील पाणीसाठ्याचा स्राेत म्हणून वापर करावयाचा असल्यास जलसंपदा विभागाकडील पाणी आरक्षणाच्या मंजुरीची आवश्यकता राहणार नाही. या तरतुदींमुळे अन्न प्रक्रिया उद्योगांना गती येणार असून, त्यानुसार प्रकल्पाचे नियोजन करावे, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले आहे.

इतर अॅग्रो विशेष
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...