agriculture news in marathi, Forcing farmers to pay cash in Satana Market Committee | Agrowon

सटाणा बाजार समितीत शेतकऱ्यांना रोख रक्कम देण्याची सक्ती
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018
सटाणा, जि. नाशिक  : येथील बाजार समितीत शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना रोख पेमेंट देण्याची सर्व व्यापाऱ्यांना सक्ती करण्यात आली असून, सोमवारपासून (ता. ६) या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरवात झाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती मंगला सोनवणे यांनी दिली.
सटाणा, जि. नाशिक  : येथील बाजार समितीत शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना रोख पेमेंट देण्याची सर्व व्यापाऱ्यांना सक्ती करण्यात आली असून, सोमवारपासून (ता. ६) या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरवात झाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती मंगला सोनवणे यांनी दिली.
कसमादे परिसरातील सर्वच बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना रोखीने पेमेंट करणे बंधनकारक असताना व्यापाऱ्यांकडून मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती. शेतमाल विक्री केलेल्या मालाच्या मोबदल्यात बहुतांशी शेतकऱ्यांना जमा पावती किंवा एक महिन्याच्या तारखेचा धनादेश दिला जात होता. अनेकवेळा व्यापाऱ्यांनी दिलेले धनादेश बाउन्स होण्याच्या तक्रारी बाजार समितीकडे येत होत्या. या तक्रारींची नवनियुक्त प्रशासन मंडळाने गंभीर दखल घेत सोमवारपासून शेतकऱ्यांना रोख स्वरूपात पेमेंट करण्याचे आदेश दिले.
 
व्यापाऱ्यांनी रोखीत व्यवहार करण्यासाठी पुरेशी रोख रक्कम मिळत नसल्याचे कारण दाखवत सोमवारी केवळ १५० वाहनांचा लिलाव न करण्याची आडमुठी भूमिका घेतली होती. मात्र, समिती संचालक मंडळाने रोख पेमेंटचा निर्णय कायम ठेवत संपूर्ण वाहनांचा लिलाव करावाच लागेल, अशी तंबी त्यांना दिल्याने व्यापाऱ्यांनी नमते घेऊन सोमवारी (ता. ६) सकाळच्या सत्रात कांद्याच्या २९० वाहनांचा लिलाव केला, तर सायंकाळी उर्वरित ३१४ वाहनांचा लिलाव केल्याची माहिती सचिव भास्कर तांबे यांनी दिली.
रोख रक्कम न मिळाल्यास बाजार समितीकडे चोवीस तासांच्या आत तक्रार करावी अन्यथा ती ग्राह्य धरली जाणार नसल्याचे समिती प्रशासनाने म्हटले आहे. 

इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये डॉ. सुजय विखे, शिर्डीत...नगर  : विसाव्या फेरीअखेर नगर लोकसभा...
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...