agriculture news in marathi, the forecast of growing the gram area, jalgaon, maharshtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज
चंद्रकांत जाधव
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017
हरभऱ्याची पेरणी वाढेल, असा अंदाज आहे. त्या दृष्टीने हरभरा बियाणे उपलब्ध करण्यासंबंधी कृषी विभागाने नियोजन केले आहे. 
- मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव.
जळगाव :  जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांत झालेल्या पावसामुळे उडीद, मूग व सोयाबीनच्या रिकाम्या क्षेत्रामध्ये हरभऱ्याची अधिक पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने बांधला आहे. सुमारे आठ ते १० हजार हेक्‍टर अधिक पेरणी होईल, अशी अपेक्षा असून, त्या दृष्टीने ‘महाबीज’कडून बियाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. 
 
जिल्ह्यात यंदा रब्बीचे अपेक्षित क्षेत्र एक लाख ३८ हजार हेक्‍टर आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला होता. त्यामुळे रब्बीचे क्षेत्र एक लाख १३ हजार हेक्‍टरपर्यंत पोचले होते. यंदाही सप्टेंबर व आता दसऱ्यानंतर झालेल्या पावसाचा लाभ रब्बीला होईल. त्यात कमी पाण्यात व कमी खर्चात येणारे पीक म्हणून हरभऱ्याला पसंती दिली जाणार आहे.
 
जळगाव, चोपडा, यावल, पाचोरा भागांतील काळ्या कसदार जमिनीत पेरणी सुरू झाली आहे. बियाणे बाजारात हरभरा बियाण्याची अधिकची उचल सुरू आहे. त्यादृष्टीने बियाणे विक्रेत्यांनी महाबीज व इतर खासजी कंपन्यांचे बियाणे उपलब्ध करून दिले आहे. महाबीजच्या बियाण्यासंबंधी कृषी विभागाने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विविध बियाणे पुरवठ्याच्या सूचना केल्याची माहिती मिळाली. 
 
हरभऱ्याचे क्षेत्र जवळपास ७५ हजार हेक्‍टरपर्यंत असू शकते. त्यासाठी महाबीजकडून तीन हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. शासकीय संस्थांकडून आणखी हरभरा बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभागाने सूचना दिल्याची माहिती मिळाली. 
 
जिल्ह्यात दादरची (रब्बी ज्वारी) पेरणी सुरू झाली आहे. तसेच मागील १० दिवसांपूर्वीच सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी संकरित ज्वारीची पेरणी केली आहे. ती ज्वारी तरारली असून, मागील चार- पाच दिवसांत झालेल्या पावसाचा तिला लाभ होणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...