agriculture news in Marathi, forecast of rain in few places in vidarbha on Wednesday, Maharashtra | Agrowon

विदर्भात काही ठिकाणी बुधवारी पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
रविवार, 10 डिसेंबर 2017

पुणे  ः बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा व जम्मू- काश्मीरच्या भागात असलेल्या चक्राकार वाऱ्याचा काहीसा परिणाम विदर्भातील वातावरणात होणार आहे. येत्या बुधवारी (ता. १३) विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

पुणे  ः बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा व जम्मू- काश्मीरच्या भागात असलेल्या चक्राकार वाऱ्याचा काहीसा परिणाम विदर्भातील वातावरणात होणार आहे. येत्या बुधवारी (ता. १३) विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.  

राजस्थानच्या वायव्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती दक्षिणेकडे सरकली आहे. त्यामुळे जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि चंडीगड या राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडेल. त्याचा विदर्भातील काही भागावर काहीसा परिणाम होणार असून वातावरणात काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे.  

बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली. हे क्षेत्र पश्चिम बंगालच्या दिशेने सरकले. त्यामुळे उडीसा, आसाम, मेघालय, मिझोराम, पश्चिम बंगाल या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज आणि उद्या मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. 

कमी दाबाचे क्षेत्र (शनिवारी) गोपाळपूरपासून पूर्वेकडे १७० किलोमीटर अंतरावर होते. दिघापासून आग्नेयकडे ३२०, परादीपपासून १२० किलोमीटर अंतरावर होते. त्यामुळे उडिसा, पश्चिम बंगालच्या भागात गेले दोन दिवस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. शनिवारी (ता. ९) वाऱ्याचा वेग ताशी ४५ त ५५ किलोमीटर एवढा होता. आज (रविवारी) त्याचा वेग ३५ ते ४५ किलोमीटर एवढा राहिला. त्यानंतर त्याचा वेग कमी होत जाऊन ते विरून जाईल. 

सध्या कोकण किनारपट्टीवरून वारे वाहत आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचाही महाराष्ट्रातील वातावरणावर झाला आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सहा ते सात अंशापर्यंत वाढ झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चांगलीच वाढ झाली. शनिवारी (ता.९) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील गोंदिया येथे १३.६ अंश सेल्सिअसएवढ्या किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

शनिवारी (ता. ९) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट ः अंश सेल्सिअसमध्ये : मुंबई (सांताक्रूझ) २१.९ (३), अलिबाग २२.० (३), रत्नागिरी २१.५ (१), डहाणू २२.५ (४), भिरा २०.० (२), नगर १५.२ (३), पुणे १८.२ (७), जळगाव १८.० (६), कोल्हापूर १८.४ (३),  महाबळेश्वर १५.६ (३), मालेगाव १८.३ (७), नाशिक १५.२ (४), सांगली १७.२ (३), सातारा १६.३ (३), सोलापूर १५.४, औरंगाबाद १६.८ (५), बीड २०.२(८), उस्मानाबाद १४.०, परभणी १८.४ (४), नांदेड १६.० (३) अकोला १६.७ (३), अमरावती १९.२(४), बुलढाणा १६.६ (३), चंद्रपूर १७.२ (४), गोंदिया १३.६ (१), नागपूर १५.१ (२), 
वर्धा १७.५ (३), यवतमाळ १६.० (१).  

इतर अॅग्रो विशेष
रत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...
‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण !पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...
कृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...
चंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...
केसर आंबा संकटातचऔरंगाबाद :  सुरवातीला मोहराच्या काळात...
त्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूधनगर/औरंगाबाद  : गतवर्षी शेतकरी संपानंतर...
पीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...
खडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...
नैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्यअमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली...
जमिनीवरील अत्याचार थांबवा !पुणे : एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे...
दुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटकापुणे : उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे...
मुदत संपलेल्या जिल्हा बँकांवर प्रशासक...मुंबई : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण चार...
वादळी पावसाने पिकांचे नुकसानपुणे : राज्यात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह...
उष्णतेच्या झळांनी विदर्भ होरपळलापुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट,...
उन्हाळ्यात केळी बागांची जपणूक महत्त्वाचीसद्यस्थितीत तापमानात वाढ सुरू झाली असून तापमान ४०...
साखर निर्यातीसाठी कारखाने अनुत्सुककोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे...
हमीभावाने तूर खरेदीचा आज अखेरचा दिवसमुंबई/ अकोला/नगर : हमीभावाने तूर खरेदीचा...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा...पुणे : राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे...
अक्षय तृतीयेला आंब्याने खाल्ला भावअक्षय तृतीया व त्यानंतर आंब्याची बाजारपेठ...