agriculture news in marathi, Forecasted to increase plantation of banana | Agrowon

कांदेबाग केळी लागवड वाढण्याचा अंदाज
टीम अॅग्रोवन
रविवार, 9 सप्टेंबर 2018

आमच्या भागात कांदेबाग केळी यंदा अधिक दिसत आहे. काही शेतकऱ्यांनी सुरवातीच्या चांगल्या दराचा लाभ मिळावा म्हणून अर्ली कांदेबाग केळी लागवडही केली आहे.
- अनिल सपकाळे, शेतकरी, करंज (जि. जळगाव)

जळगाव : जिल्ह्यात कांदेबाग केळीचे क्षेत्र यंदा सुमारे दोन ते अडीच हजार हेक्‍टरने वाढू शकते. चोपडा, जळगाव आणि यावल तालुक्‍यात कांदेबाग केळी लागवड सुरू आहे. ऑक्‍टोबरअखेरपर्यंत ही लागवड सुरू राहील.

कापूस पीक आतबट्ट्याचे बनले. गुलाबी बोंड अळी व मजुरीचा खर्च वाढल्याने ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक जलसाठा आहे. जमीन हलकी, मध्यम आहे, त्यांनी कांदेबाग केळीला पसंती दिली आहे. गिरणा व तापी नदीच्या काठावरील गावांमध्ये ही लागवड अधिक असून, पाचोरा व भडगाव तालुक्‍यातही काही प्रमाणात लागवड सुरू आहे. चोपडा तालुक्‍यात सर्वाधिक म्हणजे पावणेपाच हजार हेक्‍टरवर कांदेबाग केळीची लागवड अपेक्षित आहे. जळगाव तालुक्‍यातही सुमारे १८०० हेक्‍टवर केळी लागवड होऊ शकते.

पाचोरा व भडगावातील काही शेतकरी यंदा कांदेबाग केळी लागवडीकडे वळले आहेत. तितूर नदीलगतचा भाग आणि भडगाव, पाचोरा तालुक्‍यात यंदा कांदेबाग केळी लागवडीचे प्रयोग काही शेतकरी करीत आहेत. जळगाव जिल्ह्यात कांदेबाग केळीचे एकूण क्षेत्र सुमारे साडेआठ हजार हेक्‍टर किंवा यापेक्षा अधिक राहू शकते, असे सांगण्यात आले.

कापूस पिकाला पर्याय
ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक जलसाठा आहे, त्यांनी कापूस पिकाऐवजी केळीला पसंती दिली. मागील दोन वर्षे तिला मिळालेले दर, हे कारण त्यामागे आहे. कापसावर गुलाबी बोंड अळी व इतर समस्या वाढत आहेत. वेचणीला मजूर ऐनवेळी मिळत नाहीत. उत्पादनही जेमतेमच असते. फेब्रुवारीत उपटून नंतर बाजरी किंवा मक्‍याचे पीक घेतात. सतत पेरणी व पाणी दिल्याने जमिनीचा पोतही बिघडतो. म्हणून केळीचे पीक घेण्यास शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे.

 

इतर बातम्या
कडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...
आटपाडी, खानापुरातही मंत्र्यांचा धावता...सांगली : ते आले... त्यांनी पाहिलं... आणि पुढं...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...
कामगारांच्या प्रश्नी चाळीस साखर...सोलापूर  : सोलापूरसह उस्मानाबाद व लातूर...
मुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...
भारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...
सरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...
खरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
नांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड   ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुणे विभागात पाणीटंचाईची तीव्रता वाढलीपुणे : पावसाळा संपताच उन्हाचा चटका वाढल्याने पुणे...
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
निर्यात वाढविण्यासाठी कृषी विभाग...परभणी ः शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...