agriculture news in marathi, the foreign tour draw for pune district will be open on Monday | Agrowon

पुण्यात परदेश दौऱ्यासाठीच्या अर्जाची सोमवारी सोडत
टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

पुणे  ः  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेशात अभ्यास दौऱ्यासाठी कृषी विभागामार्फत पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी नुकतेच अर्ज मागविण्यात आले होते. या अर्जाची जेष्ठता सुची तयार करण्यासाठी सोमवारी (ता.६) दुपारी तीन वाजता विभागीय कृषी विस्तार केंद्र शिवाजीनगर येथे सोडत कार्यक्रम आयोजित केली आहे. 

पुणे  ः  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेशात अभ्यास दौऱ्यासाठी कृषी विभागामार्फत पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी नुकतेच अर्ज मागविण्यात आले होते. या अर्जाची जेष्ठता सुची तयार करण्यासाठी सोमवारी (ता.६) दुपारी तीन वाजता विभागीय कृषी विस्तार केंद्र शिवाजीनगर येथे सोडत कार्यक्रम आयोजित केली आहे. 

पुणे जिल्ह्यातील विविध पिकांची उत्पादकता, पीक पद्धतीमधील आधुनिक तंत्रज्ञान, कृषी उत्पादनाचे बाजार व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, कृषी प्रक्रियेतील अद्यावत पद्धती यामध्ये आमूलाग्र बदल आणण्यासाठी शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे ही राज्य पुरष्कृत योजना राबविण्यात येत आहे. विविध देशांनी विकसित केलेल्या शेतीविषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी त्याचा केलेला अवलंब व त्याद्वारे त्याच्या उत्पादनात झालेली वाढ याबाबत त्या-त्या देशांतील शास्त्रज्ञांशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रीय भेटी तसेच संबधित संस्थांना भेटी याद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान व क्षमता उंचावण्यासाठी अभ्यास दौरे आयोजित केले जाते. 

त्यासाठी जिल्हयातील ४९६ शेतकऱ्यांनी या अभ्यासदौऱ्यासाठी अर्ज केलेले आहेत. शासनाच्या सुचनेनुसार या अर्जातून पात्र शेतकऱ्यांची लॉटरी पद्धीतीने जेष्ठता सुची करण्याचे निर्देश दिले आहे. त्यासाठी लॉटरी पद्धतीने जेष्ठता सूची तयार करण्यात येणार आहे. तरी अर्जदार शेतकऱ्यांच्या सक्षम लॉटरी पद्धतीने सोडत असल्याने सर्व अर्जदार शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

इतर ताज्या घडामोडी
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...