agriculture news in marathi, forestry Minister Sudhir Mungantivar in pune, Tree plantation movement | Agrowon

वृक्ष लागवडीला वन सत्याग्रहाचे स्वरूप देणार : मुनगंटीवार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 मे 2018

पुणे : हरित महाराष्‍ट्रासाठी या वर्षीच्या १३ काेटी वृक्ष लागवडीला वन सत्याग्रहाचे स्वरूप देण्यात येणार आहे. तर, वृक्ष लागवड ही केवळ चळवळ न राहता यामाध्यामातून राेजगार निर्मितीदेखील करणार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी (ता.१७) पत्रकार परिषदेमध्ये दिली. 

पुणे : हरित महाराष्‍ट्रासाठी या वर्षीच्या १३ काेटी वृक्ष लागवडीला वन सत्याग्रहाचे स्वरूप देण्यात येणार आहे. तर, वृक्ष लागवड ही केवळ चळवळ न राहता यामाध्यामातून राेजगार निर्मितीदेखील करणार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी (ता.१७) पत्रकार परिषदेमध्ये दिली. 

पुणे महसूल विभागाच्या वृक्ष लागवड नियाेजनाची बैठक मंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली. या वेळी मंत्री मुनगंटीवार म्हणाले, की सरकारच्या वतीने २०१५ पासून लाेकसहभागातून वृक्ष लागवड करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी १३ काेटी  वृक्ष लागवडीचे उ.िद्दष्ट ठेवण्यात आले असून, पुणे विभागाचे उ.िद्दष्ट १ काेटी ५५ लाख ९० हजार वृक्षांचे असून, १२ हजार ४८१ हेक्टरवर लागवड करण्यात येणार आहे. वृक्ष लागवडीतून राेजगार निर्मितीदेखील व्हावी, यासाठी मनरेगाच्या माध्यमातून खासगी क्षेत्रावर तुती, बांबू आणि विविध वृक्षांची लागवड करण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. तर, फलाेत्पादनासाठीची मर्यादा ६ हेक्टरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

‘‘बांबूपासून राेजगार निर्मिती करण्यासाठी पुणे विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि गाडगेबाबा विद्यापीठामध्ये १ आॅगस्टपासून बांबू प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच, महामार्ग उभारताना कंत्राटदारांकडून हाेणाऱ्या वृक्षताेडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक महिन्याला आढावा घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जंगलांच्या लगत आणि जंगलावर अवलंबून असणाऱ्या १५ हजार ५०० गावांमध्ये उज्ज्वला याेजने अंतर्गत केंद्र शासनाच्या मदतीने १०० टक्के गॅस वाटप करण्यात येणार आहे,’’ असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...