Agriculture News in Marathi, former chief minister ashok chavan criticise on govt, maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांबाबत सरकार उदासीन ः अशोक चव्हाण
टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 डिसेंबर 2017

कोल्हापूर : शेकडो कोटी रुपयांच्या खोट्या जाहिराती करून सरकार जनतेची फसवणूक करत आहे. न केलेल्या कामाची जाहिरात करून जनतेचा पैसा उधळण्याऐवजी एवढ्याच रकमेची कर्जमाफी केली असती, तर काही शेतकऱ्यांना तरी नक्कीच फायदा झाला असता, अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. १) येथे केली.

सतेज कृषी प्रदर्शनच्या उद्‍घाटनासाठी आले असता येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारची उदासीनता आहे. खरेदी केंद्रे कुठेच सुरू नाहीत. सरकार व व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करत नसल्याने सोयाबीन, तुरीच्या किमती घसरल्या आहेत.

ऑनलाइन खरेदीचा गोंधळ कायम आहे. वीज नसणे, तासनतास रांगेत उभा राहणे यामुळे शेतकऱ्यांत संतप्त प्रतिक्रिया आहेत. सरकारच्या नाकर्तेपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सरकारची कर्जमाफी ही फसवी आहे. याचा मोठा फटका सरकारला नजीकच्या काळात बसण्याची शक्‍यता अाहे, असे श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले. श्री. चव्हाण यांनी या वेळी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाचीही भेट घेतली.

इतर ताज्या घडामोडी
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...