उद्धव ठाकरे गप्प बसा; अन्यथा रहस्ये बाहेर काढू : राणे

माजी मुख्यमंत्री नारायण राणे
माजी मुख्यमंत्री नारायण राणे

सांगली ः शिवसेना सोडण्याचे कारण उद्धव ठाकरे आहेत. ते द्वेषाचे राजकारण करायचे. ते कट कारस्थानी होते, म्हणून मी साहेबांना सांगून सेना सोडली. उद्धव म्हणतात, राणे यांनी साहेबांना मी त्रास दिला म्हणून मला मंत्री होण्यासाठी पाठिंबा देणार नाहीत, असे म्हणत आहेत. उद्धव ठाकरे जर गप्प बसले नाहीत तर मलाही त्यांची कौटुंबिक रहस्ये बाहेर काढावी लागतील, असा इशारा माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी दिला आहे.

सांगली येथे शनिवारी (ता. 9) येथील विविध क्षेत्रांतील जनतेला भेटण्यासाठी श्री. राणे आले होते. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

श्री. राणे म्हणाले, ""पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वच पक्षाचे नेते येऊन गेले. एकमेकांवर टीकाही केली. एकमेकांवर टीका करण्यापेक्षा जनतेचे प्रश्‍न, कर्जमाफीबाबत सोडवण्यासाठी एकत्र आले असते तर त्याचा जनतेला फायदा झाला असता. उद्धव ठाकरे सत्तेत असून सरकारवर टीका करत आहेत. कर्जमाफी न दिल्यास सत्तेतून बाहेर पडू म्हणणारे उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या पक्षाचे मंत्री मूग गिळून गप्प बसत आहेत. मात्र, ठोस असा निर्णयदेखील घेण्याचे धाडस नसल्याने सत्तेची चिटकून आहेत. कोल्हापुरात सहा आमदार आहेत, मंत्रिपदाचे स्वप्न दाखवले, पण मुंबईतील नेत्यांना आमदारकी देऊन मंत्रिपदे बहाल केली. मात्र शिवसेनेच्या मंत्र्यांकडून जनतेचे प्रश्‍न तसेच राहिले आहेत.''

ते पुढे म्हणाले, की कॉंग्रेसनेही मुख्यमंत्री करतो म्हणून अनेकवेळा फसविले. म्हणूनच स्वाभिमान पक्ष काढला. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन पक्षाची बांधणी सुरू केली आहे. सांगलीमध्ये अनेक लोक भेटत आहेत. त्यांना पक्षात येऊ पाहत आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील लोकांशी चर्चा करून पक्षात घेतले जाणार आहे.

सांगली, कुपवाड, मिरज महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातली आहे. तोपर्यंत आमचा जम बसेल असा मला विश्‍वास आहे. निवडणुकीचा अंदाज घेऊन आमच्या पक्षात येणारे नगरसेवक यांच्याशी चर्चा करून निवडणूक लढविणार आहे. कदाचित आघाडी झाल्यास ती ही ताकदीने लढविणार आहे. हा पक्ष एनडीएमध्ये आहे; कारण समस्या सोडविण्यासाठी सरकारची गरज असते. मराठा, धनगर आरक्षण, मागासवर्गीयांचे प्रश्न सोडविणार आहे, असे आश्‍वासन त्यांनी दिले आहे.

गुजरातच्या निवडणुकीसंदर्भात श्री. राणे यांना विचारले असता, ते म्हणाले की गुजरात राज्यातील निवडणूक चुरशीची आहे. त्यामुळे निकाल काय येईल हे सांगणे कठीण आहे.  

मी मुख्यमंत्री असताना शिवसेना 100 टक्के कार्यक्षम होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी सेनेची सूत्रे हाती घेतली. यामुळे आज सेना केवळ पाच टक्केच सक्षम आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. - नारायण राणे, माजी मुख्यमंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com