Agriculture News in Marathi, former deputy chief minister Ajit pawar criticised on Govt, Maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांची वीजजोडणी तोडली तर खपवून घेणार नाही
सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017
आष्टी, जि. बीड : कर्जमाफी फसवी आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढतच आहेत. सरकारला शेतकरी उद्‌ध्वस्त करायचा आहे. सरकारने शेतकऱ्यांची हेळसांड थांबवावी; अन्यथा त्याची किंमत मोजावी लागेल, असे मत माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांची वीज तोडायचा प्रयत्न केला तर ते खपवून घेणार नाही, असा इशारा श्री. पवार यांनी दिली.
 
आष्टी, जि. बीड : कर्जमाफी फसवी आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढतच आहेत. सरकारला शेतकरी उद्‌ध्वस्त करायचा आहे. सरकारने शेतकऱ्यांची हेळसांड थांबवावी; अन्यथा त्याची किंमत मोजावी लागेल, असे मत माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांची वीज तोडायचा प्रयत्न केला तर ते खपवून घेणार नाही, असा इशारा श्री. पवार यांनी दिली.
 
आष्टी (जि. बीड) येथे सोमवारी (ता. १३) अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावा झाला. या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार अमरसिंह पंडित, जयसिंग सोळंके, मतदारसंघाचे नेते बाळासाहेब आजबे, आमदार सतीश चव्हाण, युवक नेते संदीप क्षीरसागर, माजी आमदार राजेंद्र जगताप, उषा दराडे, राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे, बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजी राऊत, माजी सभापती महेंद्र गर्जे, महेबूब शेख, ज्येष्ठ नेते रामकृष्ण बांगर, चंपावतीबाई पानसंबळ, विश्वास नागरगोजे अादी उपस्थित होते.
 
या वेळी भाजप नेते आणि जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब आजबे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. 
 
कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक ः मुंडे
धनंजय मुंडे म्हणाले, की सरकारला शेतकरी उद्ध्वस्त करायचा आहे. सोयाबीन, मूग व इतर पिकांकडे दुर्लक्ष करण्यात अाले अाहे. कर्जमाफीत फसवणूक केली. कर्जमाफी योजनेवर टीका होऊ नये म्हणून छत्रपतींचे नाव दिले आहे. लाभार्थी जाहिरातीही फसव्या आहेत. लाभार्थी जुन्या काळातील आहेत, असा अारोप त्यांनी केला.

इतर ताज्या घडामोडी
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...
सातारा जिल्ह्यातील पश्‍चिम भागात दमदार...सातारा : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील महाबळेश्वर,...
कोल्हापुरात पंधरा लाख लिटर दुधाचे संकलन...कोल्हापूर ः गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये...
बीड जिल्ह्यात दुधाचे संकलन ठप्पबीड : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...