‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-किल्ल्यांचा रस्तेविकास

गड-किल्ले पर्यटनाला चालना देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावित ‘स्वराज्य स्वर्णिम'' योजनेचे आम्ही स्वागत करतो. गड-किल्ले एसटी बससेवेद्वारे जोडण्याची मागणी यापूर्वीच राज्य मार्ग परिवहन विभागाकडे केली आहे. विविध किल्ल्यांना जोडताना एसटीच्या संबंधित मार्गिकेला त्या किल्ल्यांची नावे देण्यात यावीत. - जितेंद्र हांडे देशमुख, सह्याद्री गिरिभ्रमण संस्था, जुन्नर (पुणे)
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-किल्ल्यांचा रस्तेविकास
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-किल्ल्यांचा रस्तेविकास

पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी गड-किल्ल्यांना जोडणाऱ्या रस्तेबांधणीचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पाच विभागांतील महत्त्वाच्या बहुतांश किल्ल्यांना जाणाऱ्या रस्तेबांधणीसाठी सुमारे २ हजार ६०० कोटींची कामे साकारत असून, अनेक ठिकाणांच्या कामांना सुरुवात झाली आहे. तर विविध कामे निविदा प्रक्रियेत आहेत. पुणे विभागासाठी सुमारे १ हजार २०० कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ही योजना राबवली जात असून, शिवजयंतीला ‘स्वराज्य स्वर्णिम'' या नावाने या योजनेची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्राला गड-किल्ल्यांची देणगी लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्रात गडकोटांना ‘राज्यलक्ष्मी‘ संबोधले आहे. याच गड-किल्ल्यांकडे जाणाऱ्या वाटा बिकट झाल्या असून, पर्यटकांना बिकट वाटांमुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गड-किल्ल्यांवर पर्यटनाला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे विविध किल्ल्यांना महामार्ग आणि राज्यमार्गांद्वारे जोडण्यासाठी विविध विभागनिहाय आराखडा करण्यात आला आहे. महामार्ग, राज्यमार्ग ते संबंधित किल्ल्याला जोडण्यासाठी सुमारे २ हजार ६०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या आराखड्यानुसार विविध किल्ल्यांच्या रस्त्यांची कामेदेखील सुरुरू झाली असून, विविध कामे निविदा प्रक्रियेत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील सूत्रांनी सांगितले. पश्‍चिम महाराष्ट्रात गड- किल्ल्यांची शृखंला असून, पुणे विभागासाठीच्या १०० किलोमीटरसाठी १ हजार २०० कोटींचा आराखडा करण्यात आला आहे. या योजनेची घोषणा येत्या शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. तर ही घोषणा शिवनेरीवरील शिवजन्मोत्सव सोहळ्यात होण्याचीदेखील शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

शिवनेरी विकासातून रोजगार शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्पाअंतर्गत विविध विकासकामे करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने शिवनेरीला जोडणारा घाटरस्ता सिमेंटचा करण्यात आला आहे. शिवनेरीच्या एकात्मिक विकास प्रकल्पामुळे पर्यटकांची संख्या वाढत आहे. वन विभागाच्या सर्वेक्षणानुसार दरवर्षी सुमारे तीन लाख पर्यटक शिवनेरीला भेट देत आहेत. एक पर्यटक किमान १०० रुपये खर्च करीत असून, शिवनेरी परिसरातील शेतकऱ्यांच्या मुलांना सरबत, ताक, लस्सी विक्रीचा चांगला रोजगार निर्माण झाला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com