agriculture news in marathi, foru agri universities to start Nano technology department | Agrowon

चारही कृषी विद्यापीठांमध्ये नॅनो टेक्नॉलॉजी विभाग सुरू होणार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 जून 2018

पुणे : कृषी विद्यापीठांमध्ये अतिसूक्ष्म तंत्रज्ञान अर्थात नॅनो टेक्नॉलॉजी कोणतेही संशोधन होत नसल्यामुळे शेतकऱ्यांसाठी आधुनिक संशोधन व शिफारशी देण्यासाठी अडथळे येत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे चारही विद्यापीठांमध्ये नॅनो टेक्नॉलॉजी विभाग सुरू करण्यावर एकमत झाले आहे. 

पुणे : कृषी विद्यापीठांमध्ये अतिसूक्ष्म तंत्रज्ञान अर्थात नॅनो टेक्नॉलॉजी कोणतेही संशोधन होत नसल्यामुळे शेतकऱ्यांसाठी आधुनिक संशोधन व शिफारशी देण्यासाठी अडथळे येत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे चारही विद्यापीठांमध्ये नॅनो टेक्नॉलॉजी विभाग सुरू करण्यावर एकमत झाले आहे. 

"कृषी क्षेत्रात काही बाबींमध्ये पदार्थाच्या अतिसूक्ष्म अवस्थेपर्यंत जाऊन संशोधन करणे अत्यावश्यक आहे. मात्र, सध्याच्या अनेक कृषी संशोधन प्रकल्पांमध्ये नॅनो तंत्रज्ञान वापरण्यात आलेले नाही. देशविदेशातील इतर कृषी शिक्षण आणि संशोधन संस्थांमध्ये या तंत्रज्ञानाच्या अभ्यासावर भर दिला जात असताना महाराष्ट्र पिछाडीवर आहे," अशी माहिती एका शास्त्रज्ञाने दिली. 
एक नॅनोमीटर म्हणजे एका मीटरचा शंभर कोटीवा भाग समजला जातो. नॅनो टेक्नॉलॉजी विभाग सुरू झाल्यास अतिसूक्ष्म अवस्थेची रचना माहिती होईल व विद्यापीठांमधील कृषी शास्त्रज्ञांना त्यांचे निष्कर्ष छातीठोकपणे मांडता येतील. जैवतंत्रज्ञानाप्रमाणेच कृषी विद्यापीठांचे नॅनो तंत्रज्ञानाकडेही दुर्लक्ष झाले आहे.  

"नॅनो टेक्नॉलॉजी विभाग सुरू करण्याबाबत यापूर्वीही चर्चा झाली होती. चारही विद्यापीठांमध्ये हा विभाग स्थापन करण्याबाबत एकमत असून, अद्याप आर्थिक तरतूद झालेली नाही. ननो टेक्नॉलॉजीविषयक सर्व सामग्री खर्चिक असल्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठांनी एकत्र येऊन एकच अात्याधुनिक प्रयोगशाळा उभारावी काय याचीही चाचपणी करावी लागेल," असे एका शास्त्रज्ञाने स्पष्ट केले. 

दरम्यान, राज्यातील कृषी अन्न प्रक्रिया उद्योगाच्या गरजा विचारात घेत उद्योजकांना उपयुक्त ठरणारे संशोधन विद्यापीठांनी करावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठांमधील प्रत्येक संशोधनाचा वापर शेतकरी वर्गाने किती केला व त्यापासून किती फायदा झाला याची कोणतीही अधिकृत माहिती सध्या विद्यापीठांकडे नाही. त्यामुळे किमान प्रत्येक विद्यापीठाने किमान प्रत्येक पाच संशोधनाचे मूल्यमापन खासगी संस्थेकडून करून घ्यावे, असाही संकल्प विद्यापीठांनी केला आहे. 
"कष्टपूर्वक संशोधनातून तयार झालेले तंत्रज्ञान अनेकदा विद्यापीठांमध्येच धूळ खात पडते. तंत्रज्ञान पुढे विकले गेले तरच विद्यापीठांना आर्थिक लाभ मिळतो आणि शेतकरी वर्गापर्यंत पोहोचते. अर्थात बाजारात चालणारे तंत्रज्ञान असले तरच उद्योजक किंवा कंपन्यांकडून ते विकत घेतले जाते. त्यामुळे उद्योजकांना उपयुक्त ठरणारे संशोधन करण्याचा आग्रह आम्ही धरत आहोत, असे विद्यापीठाच्या एका संशोधन संचालकाने सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...