मक्याच्या फ्युचर्स भावात घट

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

या सप्ताहात मका व हळद वगळता सर्वांचे भाव घसरले किंवा स्थिर राहिले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका वगळता सर्व पिकांचे भाव वाढतील.   सोयाबीन आत्ता स्पॉटमध्ये न विकता जुलै फ्युचर्समध्ये विकला तर ३ टक्क्यांनी अधिक भाव (रु. ३,८५०) मिळेल. गवार बीचे भाव जूनमध्ये सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा २.४ टक्क्यांनी अधिक (रु. ४,२५९) मिळतील. कापसाचे भाव जुलैमध्ये ७ टक्क्यांनी अधिक मिळतील (रु. २१,०००). हरभऱ्याचे भाव जूनमध्ये १.९ टक्क्याने अधिक असतील (रु. ३,७४४) गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते. मका रब्बी मक्याच्या (एप्रिल २०१८) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु. १,१७३ ते रु. १,१५०). या सप्ताहात त्या ६.८ टक्क्यांनी वाढून रु. १,२२६ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,२९० वर आल्या आहेत. जून २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,१८० वर आल्या आहेत. हमीभाव रु. १,४२५ आहे. वाढत्या उत्पादनाच्या व नवीन आवकेच्या अपेक्षेने किमती कमी होण्याची शक्यता आहे. साखर साखरेच्या (एप्रिल २०१८) किमती फेब्रुवारी महिन्यात चढत होत्या (रु. २,९५२ ते रु. ३,३६१). या सप्ताहात त्या रु. ३,३६१ वर स्थिर आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,०७३ वर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जुलै (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३,३६१ वर आल्या आहेत. १९ डिसेंबर रोजी केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार या वर्षी भारतातील साखरेचे उत्पादन २४९ लाख टन होईल. (गेल्या वर्षीचे उत्पादन : २५० लाख टन). साखरेचे भाव काही प्रमाणात चढण्याची शक्यता आहे. सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती फेब्रुवारी महिन्यात रु. ३,९९७ पर्यंत वाढल्या व नंतर त्या रु. ३,८०० च्या दरम्यान राहिल्या. गेल्या काही दिवसांत त्या घसरत आहेत. या सप्ताहात त्या १.६ टक्क्यांनी घसरून रु. ३,७३० वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती १ टक्क्याने घसरून रु. ३,७३८ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,८५० वर आल्या आहेत. हमीभाव (बोनससहित) रु. ३,०५० आहे. आंतरराष्ट्रीय व देशातील उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. खाद्य तेल-उद्योगाची मागणी वाढत आहे. शासनाने हमीभावाने सोयाबीन जरी खरेदी करण्याची तयारी दर्शवली असली, तरी यावर्षी ती वेळ येणार नाही. पुढील वर्षी सोयापेंडीच्या निर्यातीत वाढ होऊन ती २० लाख टनांवर जाईल असा अंदाज केला गेला आहे (मागील वर्षीची निर्यात : १५ लाख टन). शासनाचे सोयापेंडीच्या निर्यातीला उत्तेजन देण्याचे धोरण आहे. आयात शुल्क ४० टक्क्यांवरून ६० टक्क्यांवर वाढवले आहे. आफ्रिकेहून आयातसुद्धा सुरू आहे. त्यामुळे पुढील काही दिवस किमतीत काहीशी घसरण अपेक्षित आहे. हळद हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती फेब्रुवारीमध्ये घसरत होत्या (रु. ७,३५२ ते ६,५७८). या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी वाढून रु. ६,८२२ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,८५० वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ३.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ७,१०८). वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. देशांतर्गत मागणी वाढती आहे. निर्यात मागणीसुद्धा वाढती आहे. मात्र, पुढील काही दिवसांत वाढत्या आवकेमुळे किमतीमधील वाढ रोखली जाईल. गहू गव्हाच्या (एप्रिल २०१८) किमती फेब्रुवारी महिन्यात वाढत होत्या (रु. १,६०० ते रु. १,७७७). या सप्ताहात त्या ०.७ टक्क्यांनी घसरून रु. १,७६३ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,७३० वर आल्या आहेत. जून २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा १.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १,७६२). एप्रिलपासून मर्यादित घसरण अपेक्षित आहे. शासनाचा हमीभाव (बोनससहित) रु. १,७३५ आहे. गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु. ४,८३१ ते रु. ४,२७६). या सप्ताहात त्या ३.१ टक्क्यांनी घसरून रु. ४,१७५ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,१६० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा जून २०१८ मधील फ्युचर्स किमती २.४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,२५९). किमती घसरण्याचा संभव आहे. हरभरा फेब्रुवारी महिन्यात हरभऱ्याच्या फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती रु. ३,७८९ वरून २० तारखेला ३,९८८ पर्यंत वाढल्या; नंतर त्या घसरत महिनाअखेर रु. ३,६६५ पर्यंत आल्या. या सप्ताहात त्या रु. ३,६६१ वर स्थिर आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ३,६७५ वर आल्या आहेत. जून २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा १.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ३,७४४). शासनाचा हमीभाव (बोनससहित) रु. ४,४०० आहे. एप्रिलनंतर भाव घसरू नयेत यासाठी शासनाचे प्रयत्न राहतील. आयात शुल्क त्यामुळे ३० टक्के लावण्यात आले आहे. विक्रीवरील स्पेशल मार्जिनसुद्धा वाढवले आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण व राजस्थान येथे शासनाची खरेदी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातसुद्धा खरेदी सुरू होईल. मध्य प्रदेशमध्ये हमीभाव व बाजारभाव यांतील फरक शासनातर्फे दिला जातो. कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती फेब्रुवारी महिन्यात रु. २०,५९० वरून १९ तारखेला रु. १९,९३० पर्यंत घसरल्या; नंतर त्या पुन्हा रु. २०,९९० पर्यंत वाढल्या. या सप्ताहात त्या २.३ टक्क्यांनी घसरून रु. २०,४४० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १९,६२५ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २१,०००). आंतरराष्ट्रीय मागणी कमी आहे. कपाशीचा एप्रिल २०१८ (सुरेंद्रनगर) डिलिव्हरी भाव (एनसीडीईएक्स) प्रति २० किलोसाठी रु. ८९३.५० आहे. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किमत प्रति १४० किलोची गाठी). 

arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com