agriculture news in marathi, forward market of agriculture commodities | Agrowon

मका वगळता सर्व पिकांच्या फ्युचर्स भावात वाढ
डॉ. अरुण कुलकर्णी
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

गेल्या सप्ताहात सोयाबीन व हरभरा पिकाच्या भावात वाढ झाली. साखरेचे भाव घसरले. इतर शेतीमालाचे भाव स्थिर राहिले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका वगळता सर्व पिकांचे भाव वाढतील.
 

गेल्या सप्ताहात सोयाबीन व हरभरा पिकाच्या भावात वाढ झाली. साखरेचे भाव घसरले. इतर शेतीमालाचे भाव स्थिर राहिले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका वगळता सर्व पिकांचे भाव वाढतील.
 
गेल्या सप्ताहात विविध संस्थांनी व्यक्त केलेले भारतातील माॅन्सूनचे अंदाज अाणि अमेरिका व चीनमधील शेतीमाल व्यापारातील अायात शुल्कवाढीमुळे शेतीमालाच्या बाजार पेठेतील संभ्रमावस्था वाढली. अमेरिकेतील आयात शुल्कावरील नियोजित वाढीला प्रत्युत्तर म्हणून चीनने अमेरिकेतून चीनला निर्यात होणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क वाढ करण्याची घोषणा केली. त्यात सोयाबीनसारखा शेतीमाल पण आहे. चीन सोयाबीनचा प्रमुख उत्पादक जरी असला, तरी अमेरिकेतील सोयाबीनची निर्यात चीनला सर्वांत जास्त होते. चीनच्या या धोरणामुळे अमेरिकेतील शेती व्यवसाय चिंतेत आहे. अमेरिकेतून कापसाचीसुद्धा चीनला मोठी निर्यात होते. या सर्वच गोष्टींमुळे जागतिक शेती उत्पादन, व्यापार व किमती यांच्यावर काय व कसा परिणाम होईल, हे सध्या सांगता येणार नाही. एनसीडीइएक्सने या महिन्यात सुरू होणारे खरीप पिकांचे ऑक्टोबर डिलिवरी साठीचे कापूस, गवार बी यांचे तर नोव्हेंबर डिलिवरीसाठीचे सोयाबीन व्यवहार लांबणीवर टाकले आहेत. कपाशीचेसुद्धा पुढील वर्षासाठीचे व्यवहार लांबणीवर टाकले गेले आहेत. मात्र, ऑगस्ट २०१८ च्या डिलिवरीसाठीचे रब्बी मका, हळद व गव्हाचे आणि सप्टेंबर डिलिवरीसाठीचे हरभऱ्याचे व्यवहार १ एप्रिलपासून सुरू झाले.

सोयाबीन आत्ता स्पॉटमध्ये न विकता जुलै फ्युचर्समध्ये विकला, तर ३.१ टक्क्यांनी अधिक भाव (रु. ४,०२६) मिळेल. गवार बीचे भाव जुलैमध्ये सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा २.९ टक्क्यांनी अधिक (रु. ४,२१९) मिळतील. कापसाचे भाव जुलैमध्ये ४.८ टक्क्यांनी अधिक मिळतील (रु. २०,७६०). हरभऱ्याचे भाव जुलैमध्ये ३.६ टक्क्यांनी अधिक असतील (रु. ३,८८५). मात्र, रबी मक्याचे भाव जूनमध्ये ११.५ टक्क्यांनी कमी मिळतील (रु. १,१६०). गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मका
रब्बी मक्याच्या (मे २०१८) किमती मार्च महिन्यात २० मार्चपर्यंत वाढत होत्या ( रु. १,१३६ ते रु. १,१८०). नंतर मात्र त्या घसरू लागल्या. या सप्ताहात त्या रु. १,१६० वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) १.१ टक्क्यांनी घसरून रु. १,३१० वर आल्या आहेत. जून २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,१६० वर आल्या आहेत. हमी भाव रु. १,४२५ आहे. वाढत्या उत्पादनाच्या व नवीन आवकेच्या अपेक्षेने किमती कमी होण्याची शक्यता आहे.

साखर
साखरेच्या (मे २०१८) किमती २१ मार्चपासून घसरत आहेत. (रु. ३,३६१ ते रु. ३,०२५). या सप्ताहात त्या रु. ३,०२५ वर स्थिर आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,००० वर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, भारतातील उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. जुलै (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३,०४३ वर आल्या आहेत. साखरेचे भाव काही प्रमाणात घसरण्याची शक्यता आहे.

सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (मे २०१८) किमती मार्च महिन्यात घसरत होत्या (रु. ३,९५१ ते रु ३,७२१). या सप्ताहात मात्र त्या परत वाढून रु. ३,९१६ पर्यंत आल्या आहेत. हवामान अंदाजाचा हा काही प्रमाणात परिणाम आहे. तेलाच्या निर्यातीला दिलेले उत्तेजनसुद्धा या वाढीला कारणीभूत आहे. स्पॉट (इंदूर) किमती ३.४ टक्क्यांनी वाढून रु. ३,९०४ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ४,०२६ वर आल्या आहेत. हमी भाव (बोनससहित) रु. ३,०५० आहे. पुढील काही दिवस भाववाढ होण्याची शक्यता आहे.

हळद
हळदीच्या फ्युचर्स (मे २०१८) किमती मार्चमध्ये प्रथम वाढत रु. ७,१३८ पर्यंत पोहोचल्या; नंतर त्या घसरू लागल्या. या सप्ताहात त्या रु. ६,६४८ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,५७८ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६,७४८). वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. देशांतर्गत मागणी वाढती आहे. निर्यात मागणीसुद्धा वाढती आहे. मात्र, पुढील काही दिवसांत वाढत्या आवकेमुळे किमतीमधील वाढ रोखली जाईल.

गहू
गव्हाच्या (मे २०१८) किमती मार्च महिन्यात वाढत होत्या. ( रु. १,७६१ ते रु. १,६९२). या सप्ताहात त्या रु. १,७०० वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,६६४ वर आल्या आहेत. जुलै २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १,७२६). एप्रिलपासून मर्यादित घसरण अपेक्षित आहे. शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. १,७३५ आहे.

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (मे २०१८) किमती मार्च महिन्यात घसरत होत्या (रु. ४,३६८ ते रु. ४,१२०). याही सप्ताहात त्या रु. ४,१२० वर स्थिर आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,१०० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा जुलै २०१८ मधील फ्युचर्स किमती २.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,२१९). किमती घसरण्याचा संभव आहे.

हरभरा
मार्च महिन्यात हरभऱ्याच्या फ्युचर्स (मे २०१८) किमती रु. ३,६१४ ते रु. ३,८१८ या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या रु. ३,७९३ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ३,७५० वर आल्या आहेत. जुलै २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ३.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु.३,८८५). शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. ४,४०० आहे. एप्रिलनंतर भाव घसरू नयेत, यासाठी शासनाचे प्रयत्न राहतील. आयात शुल्क त्यामुळे ३० टक्के लावण्यात आले आहे. विक्रीवरील स्पेशल मार्जिन सुद्धा वाढवले आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण व राजस्थान येथे शासनाची खरेदी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात व मध्य प्रदेश मध्येसुद्धा खरेदी सुरू होईल. कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (मे २०१८) किमती ८ मार्चपासून घसरत होत्या. (रु. २१,४३० ते रु. २०,५६०). या सप्ताहात त्या रु. २०,८८० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १९,८१४ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २०,७६०). किमतीत काही वाढ शक्य आहे. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १४० किलोची गाठी).

arun.cqr@gmail.com

इतर अॅग्रोमनी
हळद वगळता सर्व शेतमालाचे भाव तेजीतया सप्ताहात साखर, सोयबीन व हळद वगळता सर्व पिकांचे...
कापूस कोंडी टाळण्यासाठी मिशन मोडवर काम...भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा कापूस उत्पादक...
हळद, हरभऱ्याच्या फ्युचर्स भावात चढ -...या सप्ताहात कापूस, गवार बी व हरभरा वगळता सर्व...
इंटरनेटद्वारे कृषिमालाचे प्रभावी विपणनएकविसाव्या शतकातील माणूसही इंटरनेटच्या वेगाने...
पुढील काही महिने हळदीच्या दरावर ठेवा...या सप्ताहात सोयाबीन व गहू वगळता सर्व पिकांचे भाव...
ऑक्टोबरमध्ये प्रथमच ब्रॉयलर बाजार...ब्रॉयलर्सचे बाजारभाव वर्षातील उच्चांकी पातळीवर...
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची गोचीकोणतेही तातडीचे, आतबट्टायचे काम करायचे असेल तर...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
व्यापारी बँका वित्तीय निरक्षरतेचा फायदा...व्यापारी बँका सामान्य कर्जदारांमधील वित्तीय...
संतुलित पुरवठ्यामुळे ब्रॉयलर्सच्या...नवरात्रोत्सवामुळे चिकनच्या सर्वसाधारपण खपात मोठी...
नवीन हंगामात कापसाची अडखळती सुरवातदेशात कापसाच्या २०१८-१९ च्या नवीन विपणन हंगामाची...
हमीभाव मनमोहनसिंग सरकारपेक्षा कमी;...नरेंद्र मोदी सरकारने जुलै महिन्यात पिकांच्या...
तेल द्या आणि तांदूळ घ्या; भारताकडून '...अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया दररोज...
थेट विक्रीचे देशी मॉडेलमहाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पुढाकारातून सेंद्रिय व...
शेतीशी नाळ जोडणारा फॅब्रिकेशन व्यवसायफॅब्रिकेशन व्यवसाय एक उत्तम लघू उद्योग आहे. या...
हेमंतरावांची शेती नव्हे ‘कंपनी’च!लखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत...
खरीप मका, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात कापूस, रब्बी मका, सोयाबीन व हरभरा...
कृषी व्यवसाय, उद्योगाकरिता व्यवहार्यता...कृषी व्यवसाय किंवा उद्योगामध्ये अपेक्षित उत्पन्न...
सोयाबीन, कापूस वगळता इतर पिकांच्या...या सप्ताहात सोयाबीन व कापूस वगळता इतर वस्तूंच्या...
सोयामील निर्यात ७० टक्के वाढण्याचा अंदाजदेशाची सोयामील (सोयापेंड) निर्यात २०१८-१९ या...