रब्बी मका, हळदीच्या भावात वाढ

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

या वर्षी सर्वसाधारण पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने प्रसिद्ध केला, त्यामुळे सोयाबीन व साखरेच्या भावात घट झाली. हरभऱ्याचे भावसुद्धा वाढत्या आवकेमुळे घसरले. रब्बी मका, हळद यांचे भाव मागणी वाढल्यामुळे वाढले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका वगळता सर्व पिकांचे भाव वाढतील. सोयाबीन आत्ता स्पॉटमध्ये न विकता जुलै फ्युचर्समध्ये विकला तर २ टक्क्यांनी अधिक भाव (रु. ३,८५७) मिळेल. गवार बीचे भाव जुलैमध्ये सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा २.६ टक्क्यांनी अधिक (रु. ४,२१५) मिळतील. कापसाचे भाव जुलैमध्ये ६ टक्क्यांनी अधिक मिळतील (रु. २१,३१०). हरभऱ्याचे भाव जुलैमध्ये ३.४ टक्क्यांनी अधिक असतील (रु. ३,७४१). मात्र रब्बी मक्याचे भाव जूनमध्ये ८.२ टक्क्यांनी कमी मिळतील (रु. १,२१२). गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते. मका रब्बी मक्याच्या (मे २०१८) किमती २० मार्चपर्यंत वाढत होत्या ( रु. १,१३६ ते रु. १,१८०), नंतर मात्र त्या घसरू लागल्या होत्या. या महिन्यात त्यांचा कल वाढता आहे. या सप्ताहातसुद्धा त्या १.४ टक्क्यांनी वाढून रु. १,१९८ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,३२० वर आल्या आहेत. जून २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,२१२ वर आल्या आहेत. हमीभाव रु. १,४२५ आहे. उत्पादन वाढलेले आहे. मात्र, मागणीसुद्धा वाढत आहे. मे महिन्यात किमती कमी होण्याची शक्यता आहे. साखर साखरेच्या (मे २०१८) किमती २१ मार्चपासून घसरत आहेत (रु. ३,३६१ ते रु. ३,०२५). या सप्ताहात त्या ४.१ टक्क्यांनी घसरून रु. २,८५८ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. २,८४२ वर आल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. जुलै (२०१८)च्या फ्युचर्स किमती रु. २,८७५ वर आल्या आहेत. साखरेचे भाव काही प्रमाणात घसरण्याची शक्यता आहे. सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (मे २०१८) किमती मार्च महिन्यात घसरत होत्या (रु. ३,९५१ ते रु. ३,७२१). या महिन्यात त्यांचा घसरण्याचा कल टिकून आहे. या सप्ताहात त्या २ टक्क्यांनी घसरून रु. ३,७७६ पर्यंत आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती २.३ टक्क्यांनी घसरून रु. ३,७८३ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,८५७ वर आल्या आहेत. हमीभाव (बोनससहित) रु. ३,०५० आहे. पुढील काही दिवस भावात काहीशी घसरण होण्याची शक्यता आहे. हळद हळदीच्या फ्युचर्स (मे २०१८) किमती मार्चमध्ये प्रथम वाढत रु. ७,१३८ पर्यंत पोचल्या; नंतर त्या घसरू लागल्या. गेल्या सप्ताहात त्या १.९ टक्क्यांनी घसरून रु. ६,५२२ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ३.४ टक्क्यांनी वाढून रु. ६,७४६ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,५५७ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ७.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ७,०३०). वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. देशांतर्गत मागणी वाढती आहे. निर्यात मागणीसुद्धा वाढती आहे. मात्र पुढील काही दिवसांत वाढत्या आवकेमुळे किमतीमधील वाढ रोखली जाईल. गहू गव्हाच्या (मे २०१८) किमती मार्च महिन्यात वाढत होत्या ( रु. १,७६१ ते रु. १,६९२). या सप्ताहात त्या रु. १,६९६ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,६८२ वर आल्या आहेत. जुलै २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १,७५४). एप्रिलपासून मर्यादित घसरण अपेक्षित आहे. शासनाचा हमीभाव (बोनससहित) रु. १,७३५ आहे. गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (मे २०१८) किमती मार्च महिन्यात घसरत होत्या (रु. ४,३६८ ते रु. ४,१२०). या सप्ताहात त्या १ टक्क्याने वाढून रु. ४,१२६ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,१०८ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा जुलै २०१८ मधील फ्युचर्स किमती २.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,२१५). किमती घसरण्याचा संभव आहे. हरभरा मार्च महिन्यात हरभऱ्याच्या फ्युचर्स (मे २०१८) किमती रु. ३,६१४ ते रु. ३,८१८ या दरम्यान होत्या. या महिन्यात त्या घसरू लागल्या आहेत. या सप्ताहातसुद्धा त्या २.१ टक्क्यांनी घसरून रु. ३,६७९ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ३,६१९ वर आल्या आहेत. जुलै २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ३.४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ३,७४१). शासनाचा हमीभाव (बोनससहित) रु. ४,४०० आहे. एप्रिलनंतर भाव घसरू नयेत यासाठी शासनाचे प्रयत्न चालू आहेत. आयात शुल्क त्यामुळे ३० टक्के लावण्यात आले आहे. विक्रीवरील स्पेशल मार्जिनसुद्धा वाढवले आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण व राजस्थान येथे शासनाची खरेदी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात व मध्य प्रदेश मध्येसुद्धा खरेदी सुरू झाली आहे. कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (मे २०१८) किमती ८ मार्चपासून घसरत होत्या. (रु. २१,४३० ते रु. २०,५६०). या महिन्यात त्या वाढू लागल्या आहेत. या सप्ताहात त्या ०.१ टक्क्याने वाढून रु. २१,०४० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २०,०९७ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २१,३१०). किमतीत काही प्रमाणात वाढ शक्य आहे. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किमत प्रति १४० किलोची गाठ).   arun.cqr@gmail.com  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com