गवार बी वगळता सर्व पिकांच्या फ्युचर्स भावात वाढ

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

एनसीडीइएक्स मध्ये या सप्ताहात हळद, गहू व हरभरा यांच्या भावात वाढ झाली. इतर पिकात घसरण झाली. कापसाचे भाव स्थिर होते. या सप्ताहात सर्वात अधिक घसरण गवार बी मध्ये (१.४ टक्के) झाली. हळदीतील वाढ ४.४ टक्के होती. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत गवार बी वगळता सर्व पिकांचे भाव वाढतील.   या वर्षी सर्व साधारण पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे सर्वच खरीप पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढेल असा अंदाज केला जात आहे. अमेरिकेतील व इतर देशातील पीक परिस्थितीचा व लागवडीखालील क्षेत्राचा अंदाज अमेरिकेच्या शेती खात्याच्या १० मे च्या अहवालात अपेक्षित आहे. त्यामुळे या अहवालाची प्रतीक्षा आहे. गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्स मधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते. मका रबी मक्याच्या (जून २०१८) किमती २० एप्रिलपर्यंत रु. १२३१ पर्यंत वाढल्या होत्या. नंतर त्या घसरू लागल्या आहेत. या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी वाढून रु. १,१८४ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) ३.३ टक्क्यांनी घसरून रु. १,१६४ वर आल्या आहेत. जुलै २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,१८४ वर आहेत. हमी भाव रु. १,४२५ आहे. उत्पादन वाढलेले आहे. मात्र मागणीसुद्धा वाढत आहे. मे महिन्यात किमतीत मर्यादित चढ- उतार होण्याची शक्यता आहे. साखर साखरेच्या (जून २०१८) किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा १ टक्क्याने घसरून रु. २,७१२ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. २,६९१ वर आल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. जुलै (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. २,७१२ वर आल्या आहेत. साखरेचे भाव काही प्रमाणात घसरण्याची शक्यता आहे. सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (जून २०१८) किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या ०.७ टक्क्यांनी घसरून रु. ३,७०७ पर्यंत आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,७२८ वर आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,७३० वर आल्या आहेत. निर्यात मागणी कमी आहे. पुढील काही दिवस भावात काहीशी घसरण होण्याची शक्यता आहे. मात्र अमेरिकेतील लागवडीखालील क्षेत्र व अर्जेन्टिनामधील पावसामुळे झालेले नुकसान यांचा अंदाज आल्यावर किमतीत बदल संभवतो. हळद हळदीच्या फ्युचर्स (जून २०१८) किमती एप्रिलमध्ये वाढत होत्या. या सप्ताहात पुन्हा ४.४ टक्क्यांनी वाढून त्यांनी रु. ७,५३४ ची पातळी गाठली आहे. स्पॉट (निझामाबाद) किमतीसुद्धा १०.८ टक्क्यांनी वाढून रु. ७,६८८ वर आल्या आहेत. ऑगस्ट २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ०.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ७,७६०). देशांतर्गत मागणी वाढती आहे. निर्यात्त मागणीसुद्धा वाढती आहे. पुढील काही दिवसांत किमतीत वाढ अपेक्षित आहे. गहू गव्हाच्या (जून २०१८) किमती एप्रिल महिन्यात रु. १,७११ ते रु. १,७७३ दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या रु. १,७७३ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,७२६ वर आल्या आहेत. ऑगस्ट २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५.५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १,८२१). पुढील दिवसात मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत. शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. १,७३५ आहे. गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (जून २०१८) किमती २० एप्रिल पासून घसरत आहेत. गेल्या सप्ताहात त्या ८.६ टक्क्यांनी घसरून रु. ३,८४२ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा १.४ टक्क्यांनी घसरून रु. ३,७८९ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती ०.२ टक्क्यांनी घसरून रु. ३,८६५ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा जुलै २०१८ मधील फ्युचर्स किमती ०.५ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ३,८४५). मे महिन्यात किमती घसरण्याचा संभव आहे. हरभरा एप्रिल महिन्यात हरभऱ्याच्या फ्युचर्स (जून २०१८) किमती घसरत होत्या. या सप्ताहात त्या २ टक्क्यांनी वाढून रु. ३,५४४ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ३,५५० वर आल्या आहेत. ऑगस्ट २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा २.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ३,६५२). शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. ४,४०० आहे. एप्रिल नंतर भाव घसरू नयेत, यासाठी शासनाचे प्रयत्न चालू आहेत. आयात शुल्क त्यामुळे ३० टक्के लावण्यात आले आहे. विक्रीवरील स्पेशल मार्जिनसुद्धा वाढवले आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, राजस्थान, महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यात शासनाची खरेदी सुरू झाली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून बाजारातील भाव वाढण्यावर होण्याचा संभव आहे. कापूस एमसीएक्स मधील कापसाच्या फ्युचर्स (जून २०१८) किमती १६ एप्रिलपर्यंत वाढत होत्या (रु. २१,४८०). नंतर त्या घसरू लागल्या आहेत. या सप्ताहात त्या रु. २१,०७० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २०,३३७ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २१,३७०). किमतीत काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १४० किलोची गाठी).   arun.cqr@gmail.com  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com