सोयाबीनच्या फ्युचर्स भावात घट

शेतीमालाचा वायदेबाजार शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार शेतीमालाचा वायदेबाजार

एनसीडीइएक्स मध्ये या सप्ताहात कापूस, मका व साखर यांच्या किमतींत घसरण झाली. इतर शेतमालात वाढ झाली. सर्वात अधिक वाढ हरभऱ्यात (४.९ टक्के) झाली. सर्वात अधिक घट कापसात (५.१ टक्के) झाली. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन मध्ये घट होईल. इतरांचे भाव वाढतील. माॅन्सूनने २० जूनपर्यंत फारशी प्रगती केली नाही. मात्र २४ जून नंतर माॅन्सून पुन्हा जोर धरील असा अंदाज आहे. १ जून पासून आतापर्यंत झालेला पाऊस सरासरीपेक्षा १९ टक्क्यांनी कमी आहे. सरासरीपेक्षा अधिक पाउस प. बंगाल, उत्तराखंड, पंजाब, हरयाणा, मध्य प्रदेश, मराठवाडा, विदर्भ, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगण, तमिळनाडू, केरळ व कर्नाटक येथे झाला आहे. या वर्षी एकूण पऊस सरासरी गाठेल असा अंदाज आहे. सर्व खरीप पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढेल असासुद्धा अंदाज केला जात आहे. साखरेचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होत आहेत. भारतातील भावातील घसरण थांबवण्यासाठी शासनाने किमान विक्री किमत जाहीर केली आहे व त्याचबरोबर इतर सवलतींसाठी रु. ७००० कोटी मंजूर केले आहेत. पुढील काही दिवसांत याचा अनुकूल परिणाम दिसेल अशी अपेक्षा आहे. गेल्या सप्ताहातील एनसीडेक्स व एमसीएक्स मधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते. मका रबी मक्याच्या (जुलै २०१८) किमती मे महिन्यात वाढत होत्या (रु. १,१७० ते रु. १,२३३). जून मध्ये त्या घसरत आहेत. या सप्ताहात त्या १.६ टक्क्यांनी घसरून रु. १,१५३ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,१३० वर आल्या आहेत. सप्टेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,१८९ वर आहेत. हमी भाव रु. १,४२५ आहे. उत्पादन वाढलेले आहे. खरिपातील वाढत्या उत्पादनाच्या अपेक्षेने किमतींत यापुढे घट संभवते. साखर साखरेच्या (जुलै २०१८) किमती १८ मे पर्यंत घसरत होत्या (रु. २,७४२ ते रु. २,६३३). त्यानंतर त्या वाढत आहेत. गेल्या सप्ताहात त्या १०.७ टक्क्यांनी वाढून रु. ३,२१४ वर आल्या होत्या. या सप्ताहात मात्र त्या ३ टक्क्यांनी घसरून रु. ३,११९ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१०० वर आल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. ऑक्टोबर (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३,१३८ वर आल्या आहेत. पुढील काही दिवसांत वाढ अपेक्षित आहे. सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (जुलै २०१८) किमती २२ मे पर्यंत वाढत होत्या (रु. ३,७१८ ते रु. ३,८२३). नंतर त्या घसरू लागल्या. या सप्ताहात त्या १.१ टक्क्यांनी वाढून रु. ३,४४१ पर्यंत आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,५३० वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,३६४ वर आल्या आहेत. जागतिक व भारताचे या वर्षीचे उत्पादन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोया-पेंडीची बंगला देशाला होणारी निर्यात या वर्षी कमी होण्याचा संभव आहे. सोया तेलावरील आयात कर वाढवला आहे. सोयाबीनच्या क्षेत्रात चांगल्या पावसामुळे वाढ होण्याची शक्यता आहे. हळद हळदीच्या फ्युचर्स (जुलै २०१८) किमती मे महिन्यात घसरत होत्या (रु. ७,७७६ ते रु. ७,१७०). या सप्ताहात त्या १.१ टक्क्याने वाढून रु. ७,२७२ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,३४४ वर आल्या आहेत. सप्टेंबर २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ७,४६८). मागणी टिकून आहे. आता आवक कमी होऊ लागली आहे. स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. किमती वाढण्याचा कल आहे. गहू गव्हाच्या (जुलै २०१८) किमती २४ मे पर्यंत वाढत होत्या (रु. १,७६७ ते रु. १,८४७). त्यानंतर त्या घसरू लागल्या आहेत. या सप्ताहात त्या २.३ टक्क्यांनी वाढून रु. १,८२९ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,७८७ वर आल्या आहेत. सप्टेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १,८३६). पुढील दिवसांत मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत. शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. १,७३५ आहे. गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (जुलै २०१८) किमती १५ मे पासून घसरत आहेत (रु. ३,९७८ ते रु. ३,६७८). या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी वाढून रु. ३,६६९ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती १.४ टक्क्यांनी वाढून रु. ३,७४१ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा ऑक्टोबर २०१८ मधील फ्युचर्स किमती २.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ३,८२६). हरभरा १४ मे नंतर हरभऱ्याच्या फ्युचर्स (जुलै २०१८) किमती घसरत आहेत (रु. ३७१९ ते रु. ३५४५). गेल्या सप्ताहात त्या ६.४ टक्क्यांनी घसरून रु. ३,३१० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ४.९ टक्क्यांनी वाढून रु. ३,४७२ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ३,५६५ वर आल्या आहेत. सप्टेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीएव्हढ्याच आहेत. (रु. ३,५६६). शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. ४,४०० आहे. एप्रिल नंतर भाव घसरू नयेत, यासाठी शासनाचे प्रयत्न चालू आहेत. आयात शुल्क त्यामुळे ३० टक्के लावण्यात आले आहे. विक्रीवरील स्पेशल मार्जिनसुद्धा वाढवले आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यात शासनाची खरेदी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील खरेदी बंद करण्यात आली आहे. किमतींत यापुढे वाढ अपेक्षित आहे. कापूस एमसीएक्स मधील कापसाच्या फ्युचर्स (जुलै २०१८) किमती १४ मे नंतर वाढत आहेत (रु. २१,००० ते रु. २२,६५०). या सप्ताहात त्या ५.१ टक्क्यांनी घसरून रु. २२,१५० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती ०.६ टक्क्यांनी वाढून रु. २२,५८५ वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा फक्त ०.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २२,७२०). आंतर-राष्ट्रीय किमती घसरत आहेत. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १४० किलोची गाठी). arun.cqr@gmail.com  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com