agriculture news in marathi, forward market for agriculture commodities | Agrowon

सोयाबीन, हरभऱ्याच्या फ्युचर्स भावात घट
डॉ. अरुण कुलकर्णी
शुक्रवार, 29 जून 2018

एनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात कापूस व हळद वगळता सर्वच पिकांत, अनुकूल पावसामुळे, घसरण झाली. कापूस व हळदीत झालेली वाढसुद्धा अल्प होती. सर्वांत अधिक घट साखरेत (३ टक्के) झाली. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन व हरभऱ्यात घट होईल. इतरांचे भाव वाढतील.

एनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात कापूस व हळद वगळता सर्वच पिकांत, अनुकूल पावसामुळे, घसरण झाली. कापूस व हळदीत झालेली वाढसुद्धा अल्प होती. सर्वांत अधिक घट साखरेत (३ टक्के) झाली. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन व हरभऱ्यात घट होईल. इतरांचे भाव वाढतील.

या सप्ताहात मॉन्सूनने समाधानकारक प्रगती केली आहे. १ जून पासून १९ जूनपर्यंत झालेला पाऊस सरासरीपेक्षा १९ टक्क्यांनी कमी होता. २६ जूनपर्यंत तो आता १० टक्क्यांनी कमी आहे. सरासरीपेक्षा अधिक पाऊस पंजाब, कोकण, मराठवाडा, विदर्भ, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगण, तमिळनाडू, केरळ व कर्नाटक येथे झाला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, ओडिशा व गुजराथ येथे झाला आहे. पुढील सप्ताहात मॉन्सूनची प्रगती चालू राहील व तो बिहार, उत्तर प्रदेश व राजस्थानपर्यंत पोचेल असा अंदाज आहे. या वर्षी एकूण पाऊस सरासरी गाठेल अशी अपेक्षा आहे. सर्व खरीप पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढेल असासुद्धा अंदाज केला जात आहे. २ जुलै रोजी खरीप मक्याचे नोव्हेंबर डिलिव्हरीसाठी एनसीडीईएक्समध्ये व्यवहार सुरू होतील. ते व त्यापुढील
खरीप मक्याचे व्यवहार एरोडऐवजी सांगली बाजारासाठी असतील. सांगली हे आता मक्याचे प्रमुख बाजार केंद्र ओळखले जाऊ लागले आहे. यामुळे हा बदल केला गेला आहे. साखरेचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होत आहेत. भारतातील भावातील घसरण थांबविण्यासाठी शासनाने किमान विक्री किमत जाहीर केली आहे व त्याचबरोबर इतर सवलतींसाठी रु. ७००० कोटी मंजूर केले आहेत. पुढील काही दिवसांत याचा अनुकूल परिणाम दिसेल अशी अपेक्षा आहे.
गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मका
रबी मक्याच्या (जुलै २०१८) किमती मे महिन्यात वाढत होत्या (रु. १,१७० ते रु. १,२३३). जूनमध्ये त्या घसरत आहेत. या सप्ताहात त्या ०.४ टक्क्याने घसरून रु. १,१४८ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,१३० वर आल्या आहेत. सप्टेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,११६ वर आहेत. हमीभाव रु. १,४२५ आहे. उत्पादन वाढलेले आहे. खरिपातील वाढत्या उत्पादनाच्या अपेक्षेने किमतींत यापुढे घट संभवते.

साखर
साखरेच्या (जुलै २०१८) किमती १८ मेपर्यंत घसरत होत्या (रु. २,७४२ ते रु. २,६३३). त्यानंतर त्या वाढत होत्या. गेल्या सप्ताहात मात्र त्या ३ टक्क्यांनी घसरून रु. ३,११९ वर आल्या होत्या. या सप्ताहातसुद्धा त्या पुन्हा ३ टक्क्यांनी घसरून रु. ३,०२५ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,०११ वर आल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. ऑक्टोबरच्या (२०१८) फ्युचर्स किमती रु. ३,१३८ वर आल्या आहेत. पुढील काही दिवसांत घट अपेक्षित आहे.

सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (जुलै २०१८) किमती २२ मेपर्यंत वाढत होत्या (रु. ३,७१८ ते रु. ३,८२३). नंतर त्या घसरू लागल्या. या सप्ताहात त्या ०.२ टक्क्याने घसरून रु. ३,४३५ पर्यंत आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,५०९ वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,३७४ वर आल्या आहेत. जागतिक व भारताचे या वर्षीचे उत्पादन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोया-पेंडीची बांगला देशाला होणारी निर्यात या वर्षी कमी होण्याचा संभव आहे. सोया तेलावरील आयात कर वाढविला आहे. सोयाबीनच्या क्षेत्रात चांगल्या पावसामुळे वाढ होण्याची शक्यता आहे. किमती घसरण्याची शक्यता आहे.

हळद
हळदीच्या फ्युचर्स (जुलै २०१८) किमती मे महिन्यात घसरत होत्या (रु. ७,७७६ ते रु. ७,१७०). या सप्ताहात त्या ०.६ टक्क्याने वाढून रु. ७,३१८ वर आल्या आहेत. स्पॉट (निजामाबाद) किमती रु. ७,४६२ वर आल्या आहेत. सप्टेंबर २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ०.५ टक्क्याने अधिक आहेत (रु. ७,५००). मागणी टिकून आहे. आता आवक कमी होऊ लागली आहे. स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. किमती वाढण्याचा कल आहे.

गहू
गव्हाच्या (जुलै २०१८) किमती २४ मेपर्यंत वाढत होत्या (रु. १,७६७ ते रु. १,८४७). त्यानंतर त्या घसरू लागल्या आहेत. या सप्ताहात त्या ०.७ टक्क्याने घसरून रु. १,८१७ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,७८७ वर स्थिर आहेत. सप्टेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १,८४७). पुढील दिवसात मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत. शासनाचा हमीभाव (बोनससहित) रु. १,७३५ आहे.

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (जुलै २०१८) किमती १५ मेपासून घसरत आहेत (रु. ३,९७८ ते रु. ३,६७८). या सप्ताहात त्या १.५ टक्क्याने घसरून रु. ३,६१० वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती २ टक्क्यांनी घसरून रु. ३,६६५ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा ऑक्टोबर २०१८ मधील फ्युचर्स किमती ३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ३,७७६).

हरभरा
१४ मेनंतर हरभऱ्याच्या फ्युचर्स (जुलै २०१८) किमती घसरत आहेत (रु. ३७१९ ते रु. ३५४५). या सप्ताहात त्या १.४ टक्क्याने घसरून रु. ३,४२३ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ३,५२५ वर आल्या आहेत. सप्टेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ०.२ टक्क्याने कमी आहेत. (रु. ३,५१८). शासनाचा हमीभाव (बोनससहित) रु. ४,४०० आहे. मात्र साठा पुरेसा असल्याने भाव कमी होत आहेत.

कापूस
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (जुलै २०१८) किमती १४ मेनंतर वाढत आहेत (रु. २१,००० ते रु. २२,६५०). या सप्ताहात त्या ०.१ टक्क्याने वाढून रु. २२,१८० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती ०.८ टक्क्याने वाढून रु. २२,७६६ वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा १.१ टक्क्याने अधिक आहेत (रु. २२,०२०). आंतरराष्ट्रीय किमती घसरत आहेत. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १४० किलोची गाठी).

arun.cqr@gmail.com

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : पेरू, गहू, हरभरा, डाळिंब,...पेरू - फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिएकर ४ रक्षक...
कमाल तापमानात वाढ, उन्हाळी हंगामाला...महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा...
पलटी नांगर, रोटाव्हेटरचे अनुदान वाढणार...जळगाव : जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात (...
ढगाळ वातावरणाचा द्राक्ष खरेदीवर परिणामपांगरी, जि. सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून...
जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोधनाशिक : नाशिक-पुणे रेल्वे लाईनच्या महाराष्ट्र रेल...
तुमच्या आग्रहापुढे मी नाही कसे म्हणू...टेंभूर्णी, जि. सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील...
शिराळ्यातील गूळ हंगाम अवघ्या तीन...सांगली ः शिराळा तालुक्यातील दरवर्षी पाच ते साडे...
आठ दिवसांत पूर्ण एफआरपी द्या; अन्यथा...सातारा ः सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर...
अडत्यांवरील कारवाईला प्रशासकांचीच...पुणे ः खरेदीदार आणि शेतकऱ्यांकडून नियमबाह्य...
छावण्यांच्या मंजुरीसाठी शिवसेनेचा ठिय्यानगर : जिल्ह्यात पशुधनाला दिलासा देण्यासाठी...
जालन्यातील कृषी माल निर्यात सुविधा...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पैठण तालुक्यातील पिकांना अवकाळीचा फटकाचितेगाव, जि. औरंगाबाद : विजेच्या कडकडाट व वादळी...
परभणी जिल्ह्यातील ‘शेतकरी सन्मान निधी’...परभणी ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी...
पाकिस्तान युद्धाच्या तयारीत,...श्रीनगर : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी...
कृषी सल्ला : वाल, आंबा, काजू, नारळ,...वाल काढणी अवस्था वाल पिकाची काढणी जसजशा शेंगा...
तेल्हारा, अकोट तालुक्यांत अवकाळी पाऊस;...अकोला : जिल्ह्यात तेल्हारा, अकोट तालुक्यांत...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत जळगाव : मागील दोन-तीन दिवसांपासून खानदेशात ढगाळ,...
अमरावती जिल्ह्यात सव्वालाख शेतकऱ्यांची...अमरावती : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील दोन...
माथाडी कामगारांच्या आंदोलनामुळे गूळ...कोल्हापूर ः माथाडी कामगारांनी जादा वेळ काम...
जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक...परभणी ः परभणी येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग...