मका वगळता सर्व पिकांच्या भावात वाढ

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

या सप्ताहात हळद, गहू व गवार बी यांच्यातील किरकोळ वाढ वगळता इतर सर्व पिकांचे भाव कमी झाले. सर्वात अधिक घसरण साखरेत (४.१ टक्के), हरभरा (३.९ टक्के) व सोयाबीनमध्ये (३.३ टक्के) झाली. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका वगळता सर्व पिकांचे भाव वाढतील. या वर्षी सर्व साधारण पाऊस पडेल असा अंदाज गेल्या सप्ताहात भारतीय हवामान खात्याने प्रसिद्ध केला. त्यामुळे सर्वच खरीप पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढेल असा अंदाज केला जात आहे. यामुळे यावर्षीचा साठा लवकर विकला जाईल, या अंदाजाने बहुतेक सर्व पिकांच्या भावात घसरण सुरू झाली आहे. सोयाबीन आत्ता स्पॉट मध्ये (रु. ३,७३७) न विकता जुलै फ्युचर्समध्ये विकला तरी अधिक भाव मिळणार नाही. गवार बीचे भाव जुलै मध्ये सध्याच्या स्पॉट किमती पेक्षा २ टक्क्यांनी अधिक (रु. ४,२८५) मिळतील. कापसाचे भाव जुलै मध्ये ५.७ टक्क्यांनी अधिक मिळतील (रु. २१,३१०). हरभ-याचे भाव जुलै मध्ये केवळ २.५ टक्क्याने अधिक असतील (रु. ३,६०१). मात्र रबी मक्याचे भाव जून मध्ये २.२ टक्क्यांनी कमी मिळतील (रु. १,२०९). गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्स मधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते. मका रबी मक्याच्या (मे २०१८) किमती २० मार्च पर्यंत वाढत होत्या ( रु. १,१३६ ते रु. १,१८०). नंतर मात्र त्या घसरू लागल्या होत्या. या महिन्यात त्यांचा कल वाढता आहे. या सप्ताहातमात्र त्या ०.७ टक्क्यांनी घसरून रु. १,१९० वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) ६.३ टक्क्यांनी घसरून रु. १,२३६ वर आल्या आहेत. जून २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,२०९ वर आल्या आहेत. हमी भाव रु. १,४२५ आहे. उत्पादन वाढलेले आहे. मात्र मागणीसुद्धा वाढत आहे. मे महिन्यात किमती कमी होण्याची शक्यता आहे. साखर साखरेच्या (मे २०१८) किमती २१ मार्चपासून घसरत आहेत. (रु. ३,३६१ ते रु. ३,०२५). या सप्ताहात त्या पुन्हा ४.१ टक्क्यांनी घसरून रु. २,७४१ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती ४ टक्क्यांनी घसरून रु. २,७२८ वर आल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. जुलै (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. २,७५७ वर आल्या आहेत. साखरेचे भाव काही प्रमाणात घसरण्याची शक्यता आहे. सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (मे २०१८) किमती मार्च महिन्यात घसरत होत्या (रु. ३,९५१ ते रु ३,७२१). या महिन्यात त्यांचा घसरण्याचा कल टिकून आहे. या सप्ताहातसुद्धा त्या ३.३ टक्क्यांनी घसरून रु. ३,६५३ पर्यंत आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती १.२ टक्क्यांनी घसरून रु. ३,७३७ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,७३८ वर आल्या आहेत. हमी भाव (बोनस सहित) रु. ३,०५० आहे. पुढील काही दिवस भावात काहीशी घसरण होण्याची शक्यता आहे. हळद हळदीच्या फ्युचर्स (मे २०१८) किमती मार्च मध्ये प्रथम वाढत रु. ७,१३८ पर्यंत पोहोचल्या; नंतर त्या घसरू लागल्या. गेल्या सप्ताहात त्या ३.४ टक्क्यांनी वाढून रु. ६,७४६ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.५ टक्क्यांनी वाढून रु. ६,७८२ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,७०८ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ७,०४४). वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. देशांतर्गत मागणी वाढती आहे. निर्यात्त मागणी सुद्धा वाढती आहे. मात्र पुढील काही दिवसांत वाढत्या आवकेमुळे किमतीमधील वाढ रोखली जाईल. गहू गव्हाच्या (मे २०१८) किमती मार्च महिन्यात वाढत होत्या. ( रु. १,७६१ ते रु. १,६९२). या सप्ताहात त्या रु. १,७०३ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,७०२ वर आल्या आहेत. जुलै २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा केवळ १ टक्क्याने अधिक आहेत (रु. १,७१९). एप्रिलपासून मर्यादित घसरण अपेक्षित आहे. शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. १,७३५ आहे. गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (मे २०१८) किमती मार्च महिन्यात घसरत होत्या (रु. ४,३६८ ते रु. ४,१२०). या सप्ताहात त्या ०.७ टक्क्यांनी वाढून रु. ४,१५४ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,२०० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा जुलै २०१८ मधील फ्युचर्स किमती २ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,२८५). मे महिन्यात किमती घसरण्याचा संभव आहे. हरभरा मार्च महिन्यात हरभऱ्याच्या फ्युचर्स (मे २०१८) किमती रु. ३,६१४ ते रु. ३,८१८ या दरम्यान होत्या. या महिन्यात त्या घसरू लागल्या आहेत. या सप्ताहातसुद्धा त्या ३.९ टक्क्यांनी घसरून रु. ३,५३५ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ३,५१७ वर आल्या आहेत. जुलै २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा २.५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ३,६०६). शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. ४,४०० आहे. एप्रिल नंतर भाव घसरू नयेत यासाठी शासनाचे प्रयत्न चालू आहेत. आयात शुल्क त्यामुळे ३० टक्के लावण्यात आले आहे. विक्रीवरील स्पेशल मार्जिनसुद्धा वाढवले आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, राजस्थान, महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यात शासनाची खरेदी सुरू झाली आहे. कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (मे २०१८) किमती ८ मार्चपासून घसरत होत्या. (रु. २१,४३० ते रु. २०,५६०). या महिन्यात त्या वाढू लागल्या आहेत. या सप्ताहात मात्र त्या १.१ टक्क्यांनी घसरून रु. २०,८१० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २०,१५५ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २१,३१०). किमतीत काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १४० किलोची गाठी).   arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com