मक्याच्या भावात घसरण

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

या सप्ताहात सर्वात अधिक घसरण गवार बी मध्ये (८.६ टक्के) झाली. हळदीतील वाढ ५.१ टक्के होती. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका वगळता सर्व पिकांचे भाव वाढतील. १ मे पासून एनसीडीइएक्स मध्ये ऑगस्ट २०१८ डिलिवरी साठी साखर आणि सप्टेंबर २०१८ डिलिवरीसाठी रबी मका, हळद व गहू यांचे व्यवहार सुरू झाले. एमसीएक्समध्ये कापसासाठी ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर २०१८ साठीचे व्यवहार सुरू झाले. एनसीडीइएक्समधील सुरू होणारे ऑक्टोबर नंतरचे हरभरा, गवार बी, सोयाबीन यांचे व्यवहार लांबणीवर टाकले गेले आहेत. सेबीच्या आदेशानुसार ते सुरू केले जातील. कापसाखेरीज इतर खरीप पिकांच्या हेजिंगसाठी त्यामुळे वाट पहावी लागेल. या वर्षी सर्व साधारण पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे सर्वच खरीप पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढेल असा अंदाज केला जात आहे. यामुळे यावर्षीचा साठा लवकर विकला जाण्याच्या शक्यतेने हळद वगळता इतर सर्व पिकांच्या भावात घसरण सुरू झाली आहे. गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते. मका रबी मक्याच्या (जून २०१८) किमती २० एप्रिलपर्यंत रु. १२३१ पर्यंत वाढल्या होत्या. नंतर त्या घसरू लागल्या आहेत. या सप्ताहात त्या २.८ टक्क्यांनी घसरून रु. १,१७५ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) २.६ टक्क्यांनी घसरून रु. १,२०४ वर आल्या आहेत. जुलै २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,१७५ वरच आहेत. हमी भाव रु. १,४२५ आहे. उत्पादन वाढलेले आहे. मात्र मागणीसुद्धा वाढत आहे. मे महिन्यात किमती कमी होण्याची शक्यता आहे. साखर साखरेच्या (जून २०१८) किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ०.७ टक्क्यांनी घसरून रु. २,७३९ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. २,७१४ वर आल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. जुलै (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. २,७३९ वर आल्या आहेत. साखरेचे भाव काही प्रमाणात घसरण्याची शक्यता आहे. सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (जून २०१८) किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या ३.३ रु. ३,७३२ पर्यंत आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,७३७ वर टिकून आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,७४५ वर आल्या आहेत. पुढील काही दिवस भावात काहीशी घसरण होण्याची शक्यता आहे. हळद हळदीच्या फ्युचर्स (जून २०१८) किमती एप्रिलमध्ये वाढत होत्या. या सप्ताहात त्या ५.१ टक्क्यांनी वाढून रु. ७,२१४ ची पातळी गाठली आहे. स्पॉट (निझामाबाद) किमती सुद्धा ३.८ टक्क्यांनी वाढून रु. ६,९६४ वर आल्या आहेत. ऑगस्ट २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ७,३८२). देशांतर्गत मागणी वाढती आहे. निर्यात्त मागणी सुद्धा वाढती आहे. पुढील काही दिवसांत किमतीत वाढ अपेक्षित आहे. गहू गव्हाच्या (जून २०१८) किमती एप्रिल महिन्यात रु. १,७११ ते रु. १,७७३ दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या रु. १,७३५ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,७११ वर आल्या आहेत. ऑगस्ट २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १,७७७). एप्रिलपासून मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत. शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. १,७३५ आहे. गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (जून २०१८) किमती २० एप्रिलपासून घसरत आहेत. या सप्ताहात त्या ८.६ टक्क्यांनी घसरून रु. ३,८४२ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती ७.८ टक्क्यांनी घसरून रु. ३,८७१ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा जुलै २०१८ मधील फ्युचर्स किमती गेल्या सप्ताहातील फ्युचर्स किमती हरभरा एप्रिल महिन्यात हरभऱ्याच्या फ्युचर्स (जून २०१८) किमती घसरत होत्या. या सप्ताहातसुद्धा त्या २ टक्क्यांनी घसरून रु. ३,४९५ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ३,४६३ वर आल्या आहेत. ऑगस्ट २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ३.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ३,५७६). शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. ४,४०० आहे. एप्रिल नंतर भाव घसरू नयेत यासाठी शासनाचे प्रयत्न चालू आहेत. आयात शुल्क त्यामुळे ३० टक्के लावण्यात आले आहे. विक्रीवरील स्पेशल मार्जिन सुद्धा वाढवले आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, राजस्थान, महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यात शासनाची खरेदी सुरू झाली आहे. बाजारातील भाव वाढण्याची शक्यता कमी आहे. कापूस एमसीएक्स मधील कापसाच्या फ्युचर्स (जून २०१८) किमती १६ एप्रिलपर्यंत वाढत होत्या (रु. २१,४८०). नंतर त्या घसरू लागल्या आहेत. या सप्ताहात त्या रु. २१,०६० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २०,१६० वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २१,३१०). किमतीत काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १४० किलोची गाठी). arun.cqr@gmail.com  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com