agriculture news in marathi, Foundation of Agriculture Development during Naik | Agrowon

नाईक यांच्या काळात कृषी विकासाची पायाभरणी : ढवण
टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 जुलै 2018

परभणी ः राज्यात १९७२ साली पडलेल्या दुष्काळात अन्नावाचून झालेले हाल बघून भूक मुक्‍तीसाठी शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध कृषी योजनांची पायाभरणी तत्कालीन मुख्यमंत्री (कै.) वसंतराव नाईक यांनी केली. त्यामुळे पुढील काळात राज्याच्या कृषी विकासास मोठी चालना मिळाली, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.

परभणी ः राज्यात १९७२ साली पडलेल्या दुष्काळात अन्नावाचून झालेले हाल बघून भूक मुक्‍तीसाठी शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध कृषी योजनांची पायाभरणी तत्कालीन मुख्यमंत्री (कै.) वसंतराव नाईक यांनी केली. त्यामुळे पुढील काळात राज्याच्या कृषी विकासास मोठी चालना मिळाली, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालयातर्फे (कै.) वसंतराव नाईक यांच्‍या जयंतीनिमित्त कृषी दिनानिमित्त रविवारी (ता. १) ‘हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक जीवनकार्य व कृषी क्षेत्रातील योगदान’ या विषयावर डाॅ. ढवण यांचे व्‍याख्‍यान झाले. विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य डॉ. पी. आर. शिवपुजे, शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ. गजेंद्र लोंढे, प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, डॉ. एन. जी. लाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. ढवण म्‍हणाले, की वसंतराव नाईक यांचे त्‍यांचे शेती आणि शेतकऱ्यांवर नितांत प्रेम होते. आधुनिक शेतीची संकल्‍पना रुजविण्‍यासाठी चार कृषी विद्यापीठाची स्‍थापना त्यांच्या काळात झाली. प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले यांनी केले. सूत्रसंचालन बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. तर सय्यद इस्‍माईल यांनी आभार मानले.

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : पेरू, गहू, हरभरा, डाळिंब,...पेरू - फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिएकर ४ रक्षक...
कमाल तापमानात वाढ, उन्हाळी हंगामाला...महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा...
पलटी नांगर, रोटाव्हेटरचे अनुदान वाढणार...जळगाव : जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात (...
ढगाळ वातावरणाचा द्राक्ष खरेदीवर परिणामपांगरी, जि. सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून...
जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोधनाशिक : नाशिक-पुणे रेल्वे लाईनच्या महाराष्ट्र रेल...
तुमच्या आग्रहापुढे मी नाही कसे म्हणू...टेंभूर्णी, जि. सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील...
शिराळ्यातील गूळ हंगाम अवघ्या तीन...सांगली ः शिराळा तालुक्यातील दरवर्षी पाच ते साडे...
आठ दिवसांत पूर्ण एफआरपी द्या; अन्यथा...सातारा ः सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर...
अडत्यांवरील कारवाईला प्रशासकांचीच...पुणे ः खरेदीदार आणि शेतकऱ्यांकडून नियमबाह्य...
छावण्यांच्या मंजुरीसाठी शिवसेनेचा ठिय्यानगर : जिल्ह्यात पशुधनाला दिलासा देण्यासाठी...
जालन्यातील कृषी माल निर्यात सुविधा...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पैठण तालुक्यातील पिकांना अवकाळीचा फटकाचितेगाव, जि. औरंगाबाद : विजेच्या कडकडाट व वादळी...
परभणी जिल्ह्यातील ‘शेतकरी सन्मान निधी’...परभणी ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी...
पाकिस्तान युद्धाच्या तयारीत,...श्रीनगर : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी...
कृषी सल्ला : वाल, आंबा, काजू, नारळ,...वाल काढणी अवस्था वाल पिकाची काढणी जसजशा शेंगा...
तेल्हारा, अकोट तालुक्यांत अवकाळी पाऊस;...अकोला : जिल्ह्यात तेल्हारा, अकोट तालुक्यांत...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत जळगाव : मागील दोन-तीन दिवसांपासून खानदेशात ढगाळ,...
अमरावती जिल्ह्यात सव्वालाख शेतकऱ्यांची...अमरावती : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील दोन...
माथाडी कामगारांच्या आंदोलनामुळे गूळ...कोल्हापूर ः माथाडी कामगारांनी जादा वेळ काम...
जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक...परभणी ः परभणी येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग...