नारायणगाव उपबाजारात कोंथिबीर, मेथीतून चार कोटींची उलाढाल 

नारायणगाव उपबाजारात कोंथिबीर, मेथीतून चार कोटींची उलाढाल 
नारायणगाव उपबाजारात कोंथिबीर, मेथीतून चार कोटींची उलाढाल 

नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात कोंथिबीर व मेथीच्या खरेदी विक्रीतून एक जानेवारी ते दहा जानेवारी दरम्यानच्या दहा दिवसांत सुमारे चार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. 

या कालावधीत कोथिंबिरीला शेकडा एक हजार रुपये ते पाच हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान उच्चांकी भाव मिळाला; तर मेथीला शेकडा तीनशे ते बाराशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. नवीन वर्षाची सुरवात कोंथिबीर उत्पादकांच्या दृष्टीने फायद्याची ठरली आहे. येथील उपबाजारात 

रोज रात्री आठ वाजता कोथिंबीर, मेथी, शेपू या भाज्यांचे; तर दिवसा टोमॅटोचे लिलाव होतात. जुन्नर, आंबेगाव, संगमनेर, शिरूर तालुक्‍यातून येथील उपबाजारात भाजीपाल्याची आवक होते. मागील वर्षभरापासून बहुतेक भाजीपाल्याला समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याने भांडवली खर्चाचा मिळालेल्या उत्पन्नाशी ताळमेळ लावताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. वाढलेली थंडी व पाणीटंचाई यामुळे मागील पंधरा दिवसांपासून भाजीपाल्याची आवक घटली आहे. 

यामुळे फ्लॉवर, वांगी, तोंडली, वालवड, टोमॅटो या भाजीपाल्यांसह कोंथिबीर, मेथीच्या बाजारभावात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. इतर भाजीपाल्याच्या तुलनेत मागील दहा दिवस कोथिंबिरीच्या जुडीला प्रतवारी नुसार दहा रुपये ते पन्नास रुपयांच्या दरम्यान उच्चांकी भाव मिळाला.

कोथिंबिरीचे एकरी तीन हजार ते चार हजार जुड्यांचे उत्पन्न निघते. एकरी पंचवीस हजार रुपयांच्या दरम्यान खर्च होतो. सध्याच्या बाजारभावाचा विचार करता विक्रीतून कोथिंबिरीचे एकरी एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न निघत असल्याने कोंथिबीर व मेथीच्या खरेदी-विक्रीतून दहा दिवसांत सुमारे चार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com