नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर क्षेत्र पेरणीविना 

नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर क्षेत्र पेरणीविना 
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर क्षेत्र पेरणीविना 

नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी क्षेत्रापैकी सुमारे चार लाख २७ हजार ८०३ हेक्‍टर क्षेत्र पेरणीविना राहिले आहे. आत्तापर्यंत २ लाख ३९ हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झालेली असल्याचा कृषी विभागाचा अहवाल असला तरी पेरलेल्या क्षेत्रापैकी सुमारे चाळीस टक्के क्षेत्रावरील पिके जागेवर करपली आहेत. 

नगर जिल्ह्यामध्ये रब्बीत सर्वाधिक ज्वारीचे क्षेत्र आहे. मात्र, यंदा सरासरीच्या सुमारे चाळीस टक्के म्हणजे दोन लाख ८५ हजार हेक्‍टर क्षेत्र पेरणीविना राहिले आहे. यंदा १ लाख ८५ हजार ७७९ हेक्‍टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झालेली आहे. गव्हाच्या पेरणीला आत्तापर्यंत जोरात सुरवात होत असते. यंदा मात्र गव्हाची आत्तापर्यंत ४२ टक्के पेरणी झालेली असून, आता पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची शक्‍यता नाही. 

दुष्काळी परिस्थितीचा रब्बीवर गंभीर परिणाम झाला असून, हरभऱ्याचे क्षेत्रही यंदा तब्बल ७५ टक्‍क्‍यानी घटले अहे. आत्तापर्यंत एक लाख १८ हजार हेक्‍टर सरासरी क्षेत्रापेकी केवळ २९ हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मकाचे क्षेत्र यंदा मोठ्या प्रमाणात घटले आहे. यंदा आत्तापर्यंत मक्याची केवळ १३ टक्के पेरणी झाली आहे. 

दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे आत्तापर्यंत ३६ टक्के पेरणी झाल्याचे सांगितले जात असले तरी त्यात आता फारसी वाढ होणार नाही. शिवाय पाण्याअभावी पेरलेली पिके वाया जात असल्याने दहा टक्केही पिके हाती येतील की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. रब्बी हंगाम वाया गेल्याचा परिणाम बाजारपेठेसह ग्रामीण भागात सामाजिक जीवनावरही होताना दिसत आहे.

तेलबियांची पेरणीच नाही  नगर जिल्ह्यामध्ये तेलबियांची पेरणी क्षेत्र सातत्याने घटत आहे. यंदा तर दुष्काळी परिस्थितीमुळे तेलबियांची पेरणी झालीच नाही. नगर जिल्ह्यामध्ये करडई, तीळ, जवस, सूर्यफूल आदी तेलबियांची पेरणी झाली नसल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. तेलबियांचे क्षेत्र वाढीसाठी कृषी विभागाने कसलेही प्रयत्न केले नसल्याचे सांगितले जात आहे.

पीक आणि पेरणी क्षेत्र (कंसात सरासरी क्षेत्र) हेक्‍टर 
ज्वारी १,८५,७७९ (४,६९,७८५) 
गहू २०,८११ (४९,७८५) 
मका ३,५३३ (२७,२४५) 
हरभरा २९,०८० (१,१८,१०३) 
करडई २ (८४४) 
तीळ ९ (१५९) 
जवस ० (१६४) 
सूर्यफूल ० (८४) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com