agriculture news in marathi, from four months yavatmal ZPs agriculutre development officer post is vaccant | Agrowon

कोणी कृषी विकास अधिकारी देता का हो...
टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 जानेवारी 2018

यवतमाळ : कीटकनाशक फवारणी विषबाधा बळी प्रकरणात कामात कुचराई झाल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी दत्तात्रेय कळसाईत यांचे निलंबन करण्यात आले. याला चार महिन्यांचा कालावधी लोटला असताना, पूर्णवेळ कृषी विकास अधिकाऱ्याची नियुक्‍ती केली गेली नाही. 

यवतमाळ : कीटकनाशक फवारणी विषबाधा बळी प्रकरणात कामात कुचराई झाल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी दत्तात्रेय कळसाईत यांचे निलंबन करण्यात आले. याला चार महिन्यांचा कालावधी लोटला असताना, पूर्णवेळ कृषी विकास अधिकाऱ्याची नियुक्‍ती केली गेली नाही. 

या दुर्घटनेत २२ शेतकरी, शेतमजुरांना या घटनांमध्ये आपले प्राण गमवावे लागले. याचे देशभरात पडसाद उमटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, राज्यमंत्री सदाशिव खोत, आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यासह अनेकांनी धाव घेत या प्रकरणांचा आढावा घेतला. चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली. त्यातही रिक्‍त पदांचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला असताना आत्महत्याग्रस्त आणि त्यानंतर आता विषबाधा बळींचा जिल्हा असलेल्या यवतमाळात मात्र चार-चार महिने महत्त्वाची पदे रिक्‍त ठेवली जात असल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. 

खरिप हंगाम तोंडावर आहे. जिल्ह्याकरिता निविष्ठा पुरवठ्याचे नियोजनाचा आराखडा कृषी विकास अधिकाऱ्याच्या माध्यमातून तयार होतो. परंतु जिल्ह्याला पूर्णवेळ कृषी विकास अधिकारीच नसल्याने हे काम प्रभावित होण्याची भीती वर्तविली जात आहे. कळसाईत यांच्या निलंबनानंतर सुमारे पंधरा दिवस त्यांचा प्रभार घेण्यासाठी कोणीच तयार होत नव्हते. अखेर उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखडे यांना दोन महिन्यांकरिता पदभार स्वीकारण्यास सांगण्यात आले. मात्र, अद्यापही पूर्णवेळ कृषी विकास अधिकारी देण्याबाबत स्पष्टता नसल्याचे समोर अाले अाहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...