agriculture news in marathi, four present BJP MPs will not contest for this loksabha | Agrowon

भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 मार्च 2019

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने शुक्रवारी रात्री उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून यात ३६ उमेदवारांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश असून जळगावमधून स्मिता वाघ, नांदेडमधून प्रताप चिखलीकर, दिंडोरीतून डॉ. भारती पवार, पुण्यातून गिरीश बापट, बारामतीतून कांचन राहुल कुल आणि सोलापूरमधून डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने शुक्रवारी रात्री उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून यात ३६ उमेदवारांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश असून जळगावमधून स्मिता वाघ, नांदेडमधून प्रताप चिखलीकर, दिंडोरीतून डॉ. भारती पवार, पुण्यातून गिरीश बापट, बारामतीतून कांचन राहुल कुल आणि सोलापूरमधून डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने गुरुवारी पहिली यादी जाहीर केली होती. पहिल्या यादीत १८४ उमेदवारांचा समावेश होता. तर शुक्रवारी रात्री जाहीर ३६ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत राज्यातील चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यात पुण्यातील विद्यमान खासदार अनिल शिरोळे, सोलापूरचे शरद बनसोडे, जळगावचे ए. टी. पाटील आणि दिंडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण यांचा समावेश आहे. जळगावमध्ये एकनाथ खडसे यांच्याऐवजी भाजपा पक्षश्रेष्ठींनी गिरीश महाजन यांच्या गटातील आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसनेही आणखी ३५ उमेदवार जाहीर केले आहेत. यात महाराष्ट्रातील पाचजणांचा समावेश आहे. यामध्ये चंद्रपूर- विनायक बांगडे, जालना- विलास औताडे, औरंगाबाद- सुभाष झांबड, भिवंडी- सुरेश टावरे, लातूर- मच्‍छिंद्र कामत यांचा समावेश आहे.

इतर ताज्या घडामोडी
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला चैत्री...सोलापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या चैत्री...
अकोला जगात ‘हॉट’ शहरांच्या यादीतअकोला : मागील दोन दिवसांपासून या भागात उष्णतेचे...
दुष्काळी भागात दाहकता वाढलीसावळज, जि. सांगली : कायमस्वरूपी दुष्काळी भाग...
विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या :...नाशिक : लोकसभेची ही निवडणूक विकासाची, सामान्य...
राहुल गांधी यांची आज संगमनेरात सभानगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काॅँग्रेसचे...
तयार करा सेंद्रिय निविष्ठाअलीकडे सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची...
रताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...
निवडणूक संपली, आता तरी दुष्काळी...सांगली ः लोकसभेची आचारसंहिता एक महिन्यापासून सुरू...
चौथ्या टप्प्यात १०९ कोट्यधीश उमेदवार...मुंबई ः राज्यातील चौथ्या टप्प्याची निवडणूक...
पुणे ः खरिपासाठी एक लाख ८५ हजार टन...पुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू...
राज्यात कलिंगड प्रतिक्विंटल ५०० ते २१००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते ११०० रुपये अकोला ः...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...