agriculture news in marathi, four taluka in only 5.45 percent of the target loan allocation | Agrowon

मराठवाड्यात उद्दिष्टाच्या केवळ ५.४५ टक्‍केच कर्जवाटप
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 जून 2018

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांत २ जूनअखरेपर्यंत प्राप्त उद्दिष्टाच्या केवळ ५.४५ टक्‍केच खरीप पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी कर्जपुरवठ्यासंदर्भात बॅंका उद्दिष्टपूर्ती बॅंका करतील का, हा प्रश्न असून मुख्यंमत्र्यांनी बॅंकांना दिलेली सूचना कागदावरच राहते की काय अशी अवस्था आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांत २ जूनअखरेपर्यंत प्राप्त उद्दिष्टाच्या केवळ ५.४५ टक्‍केच खरीप पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी कर्जपुरवठ्यासंदर्भात बॅंका उद्दिष्टपूर्ती बॅंका करतील का, हा प्रश्न असून मुख्यंमत्र्यांनी बॅंकांना दिलेली सूचना कागदावरच राहते की काय अशी अवस्था आहे.

औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांना येत्या खरीप हंगामासाठी ४८३२ कोटी ५३ लाख ६० हजार रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका, व्यापारी बॅंका व ग्रामीण बॅंक शाखांनी या उद्दिष्टाची पूर्ती करणे अपेक्षित आहे. येत्या वर्षात खरीप व रब्बीसाठी पतपुरवठा करताना जिल्हा सहकारी बॅंकांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन शासनाने राष्ट्रीयीकृत बॅंकांवर कर्जवाटपाचा अधिकचा बोजा टाकला आहे. परंतु प्रत्यक्षात कर्जवाटपात या बॅंका मोठ्या प्रमाणात पिछाडीवर असल्याचे चित्र चारही जिल्ह्यांत पाहायला मिळते आहे.

औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली व या चारही जिल्ह्यांत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी २ जूनपर्यंत प्राप्त उद्दिष्टाची ८.५४ टक्‍केच पूर्ती केली. दुसरीकडे ग्रामीण बॅंकेने प्राप्त उद्दिष्टाच्या १४.६१ टक्‍के कर्जपुरवठा केला. तर व्यापारी बॅंकांनी केवळ ३.०३ टक्‍के उद्दिष्टपूर्ती केल्याचे चित्र आहे.

५१ हजार २२६ शेतकऱ्यांनाच मिळाले कर्ज
औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चारही जिल्ह्यांतील केवळ ५१ हजार २२६ शेतकऱ्यांनाच आजवर २६३ कोटी ५६ लाख १६  हजार रुपये कर्जाचे वाटप करण्यात आले. यामध्ये चारही जिल्ह्यांतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी कर्जपुरवठा केलेल्या ३१ हजार १६४, व्यापारी बॅंकांनी कर्जपुरवठा केलेल्या ९४४८ तर ग्रामीण बॅंकांनी कर्जपुरवठा केलेल्या १० हजार ६१४ शेतकरी सभासदांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ
हमीदराने शेतीमाल खरेदीत शासन दावे करीत असले तरी प्रत्यक्षात लाइनवरच नसलेल्या ऑनलाइनच्या जंजाळात अडकण्यापेक्षा गरज ओळखून शेतकऱ्यांना आपला उत्पादित माल हमीदरापेक्षा कमी दराने विकण्याशिवाय पर्याय उरला नाही. मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची खरेदीच होणे बाकी असताना खरेदी बंद झाल्याने खरिपासाठी पैशाची सोय करणारा हरभरा शेतकऱ्यांना विकता आला नाही. दुसरीकडे विकलेल्या तुरीचे चुकारेही मोठ्या प्रमाणात थकलेले आहेत. अशा स्थितीत कर्जाच्या पुरवठ्याशिवाय शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीची सोय लावणे शक्‍य होईल, असे चित्र नाही. त्यामुळे पतपुरवठ्याअभावी शेतकरी अडचणीत येण्याची शक्‍यताच जास्त आहे.

जिल्हानिहाय कर्ज मिळालेल्या
शेतकरी सभासदांची संख्या
औरंगाबाद    २०५९७
जालना    २२९१९
परभणी    ५६२५
हिंगोली    २०८५
जिल्हानिहाय कर्जपुरवठा
औरंगाबाद    १२५ कोटी २९ लाख ९९ हजार
जालना        ९१ कोटी ५० लाख ०४ हजार
परभणी         ३५ कोटी ११ लाख ४१ हजार
हिंगोली        ११ कोटी ६४ लाख ७२ हजार

चार जिल्ह्यांत बॅंकनिहाय उद्दिष्ट व पूर्ती
बॅंक  उद्दीष्ट   पूर्तता
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ८०० कोटी ६४ लाख ४२ हजा ६८ कोटी ३७ लाख ८३ हजार
व्यापारी बॅंक ३४०१ कोटी ५८ लाख ७१ हजार १०३ कोटी ०८ लाख २६ हजार
ग्रामीण बॅंक ६३० कोटी ३० लाख ४७ हजार ९२ कोटी १० लाख ०७ हजार

 

इतर ताज्या घडामोडी
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...