agriculture news in marathi, The four-way national highway is expected to start in October | Agrowon

राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण आॅक्टोबरमध्ये सुरू होण्याची शक्यता
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण येत्या ऑक्‍टोबरच्या अखेरीस सुरू होईल, अशी शक्‍यता आहे. सध्या काम रखडतच सुरू असले तरी, या कामासाठी वाळू पुरवठा सुरळीत ठेवण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. या कामाला गती मिळण्यासाठी केंद्र स्तरावरूनही कार्यवाही केली जाईल, अशी शक्‍यता आहे.

जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण येत्या ऑक्‍टोबरच्या अखेरीस सुरू होईल, अशी शक्‍यता आहे. सध्या काम रखडतच सुरू असले तरी, या कामासाठी वाळू पुरवठा सुरळीत ठेवण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. या कामाला गती मिळण्यासाठी केंद्र स्तरावरूनही कार्यवाही केली जाईल, अशी शक्‍यता आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीपासून जळगाव जिल्ह्यातील तरसोदपर्यंत आणि तरसोदपासून धुळे जिल्ह्यातील फागणेपर्यंत चौपदरीकरणासाठीची कार्यवाही जिल्हा प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करीत आहे. दोन वेगवेगळे कंत्राटदार त्यासाठी नियुक्त केले आहेत. या कामांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया पार पडली आहे. चिखली ते तरसोद यादरम्यानच्या कामाची सुरवात बऱ्यापैकी झाली आहे. महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीत खुणा केल्या आहेत (मार्कींग). अनेक ठिकाणी महामार्गाआड असलेले वृक्ष तोडणे, सपाटीकरण आदी कामही सुरू आहेत.

तरसोद ते पाळधी यादरम्यानचा बायपास जळगावनजीक असून, यादरम्यान पाळधीनजीक संपादीत जागेत सपाटीकरण, मुरूम टाकण्याचे काम वेगात सुरू होते. पावसाळा सुरू होताच काम मंदावले. पुढे दसरा सणानंतर या कामाला गती देण्यासाठी प्रशासनाने वाळू कोठून मिळेल, तिची उपलब्धता, गरज याबाबत चर्चा केली. सुमारे २० ते २२ हजार ब्रास वाळूची गरज या कामासाठी भासेल.

संपादीत जमिनीत पिके

महामार्गासाठी संपादीत जमिनीत मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव, धरणगाव, पारोळा, धुळे आदी तालुक्‍यांमध्ये अनेक शेतकऱ्यांची पिके आहेत. ती ऑक्‍टोबरपर्यंत हाती येतील. ज्या शेतकऱ्यांची केळी व इतर फळ पिके आहेत, ती मात्र काढून फेकली जातील. कारण संबंधित संपादीत जमिनीच्या क्षेत्रात पिके घेण्याची परवानगी शेतकऱ्यांना नाही. या जमिनीचा मोबदला या शेतकऱ्यांना दिल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...