agriculture news in marathi, fourty thousand hector under hailstorm in varhad | Agrowon

वऱ्हाडात गारपिटीने ४० हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान
वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

अकोला : वऱ्हाडात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे ४० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात अाहे. रब्बीतील गहू, हरभरा, बीजोत्पादन कांदा, भाजीपाला, संत्रा, केळी, द्राक्ष या पिकांचे अतोनात नुकसान झाले अाहे. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी पंचनामा करण्याबाबत निर्देश दिल्यानंतर कृषी विभागाने तातडीने नजरअंदाज पंचनामे केले अाहेत. 

अकोला : वऱ्हाडात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे ४० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात अाहे. रब्बीतील गहू, हरभरा, बीजोत्पादन कांदा, भाजीपाला, संत्रा, केळी, द्राक्ष या पिकांचे अतोनात नुकसान झाले अाहे. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी पंचनामा करण्याबाबत निर्देश दिल्यानंतर कृषी विभागाने तातडीने नजरअंदाज पंचनामे केले अाहेत. 

गारपीट व अवकाळी पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यात सुमारे ३५ हजार हेक्टरवरील गहू, हरभरा, भाजीपाला, द्राक्ष, केळी, अांबे या फळबागांचे नुकसान झाले. अकोला जिल्ह्यात नुकसानाचे क्षेत्र ४ हजार ३६०  हजारांपर्यंत तर वाशीममध्ये पाच हजार हेक्टरपर्यंत नुकसानीचे क्षेत्र असल्याचे सांगितले जाते. प्रशासन सध्या अाकड्यांची जुळवाजुळव करीत अाहे.   

बुलडाणा जिल्ह्यात सुमारे पावणेचारशे गावे या अापत्तीत सापडली. वाशीम जिल्ह्यात रिसोड व मालेगाव तालुक्यांतील २५ गावांमध्ये धुवांधार गारपीट झाली. अकोला जिल्ह्यात तेल्हारा, अकोट, अकोला, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, पातूर तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यात हरभरा पिकाचे सर्वाधिक पावणेचार हजार हेक्टरवर नुकसान झाले.

वीज पडून युवती ठार
रविवारी (ता. ११) मोताळा तालुक्यातील गिरोली येथील निकीता गणेश राठोड (वय १६) ही कापूस वेचत असताना वीज पडल्याने मृत्यूमुखी पाडली. तर या घटनेत तिची बहीण नेहा ही जखमी झालेली अाहे. 

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही  
कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सोमवारी (ता. १२) सकाळी बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून प्रशासनाने तातडीने माहिती गोळा करण्याची सूचना केली. शेतकऱ्यांना एनडीआरएफ व विम्यातून मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी फुंडकर म्हणाले, राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यासह इतर काही भागांत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, जिल्हा प्रशासनाने विमा कंपन्यांची बैठक घेऊन गावनिहाय नुकसान झालेली आकडेवारी त्यांना उपलब्ध करून द्यावी. ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरविला नसेल त्यांना नैसर्गिक आपत्तीतून मदत दिली जाईल. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून, त्यांच्या पाठिशी भक्कमपणे सरकार उभे राहील असेही त्यांनी सांगितले. 

पक्ष, संघटनांकडून मदतीची मागणी
दोन दिवसांतील गारपिटीच्या अापत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने याबाबत तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली अाहे.

इतर ताज्या घडामोडी
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पुणे जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेच्या...पुणे : केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान...
हिंगोलीतील २७ हजार लोकसंख्या पाण्यासाठी...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
खानदेशात चारा प्रश्‍न गंभीरजळगाव ः खानदेशात सद्यःस्थितीत निर्माण झालेल्या...
दुष्काळमुक्त मराठवाड्याचा संकल्प ः...औरंगाबाद: पन्नास टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात...
छपन्न इंचीच्या छातीच्या गप्पा कशाला?ः...चाकण, जि. पुणे: देशाचे पंतप्रधान देश माझ्या मुठीत...
योग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...
औरंगाबादला कैरी प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कृषी क्षेत्रात निर्मिती उद्योगाच्या...अकोला : कृषी क्षेत्रात बायोफर्टिलायजर,...
खानदेशात भुईमूग पीक जेमतेमजळगाव : भुईमुगाचे पीक खानदेशात जेमतेम आहे. त्याचे...
सोलापूर जिल्हा बॅंकेतही मिळणार ‘सन्मान...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा...
लाल कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव : लाल कांद्याची जळगावसह धुळे, साक्री येथील...
प्रस्तावित सुरत-हैदराबाद...नाशिक : केंद्राच्या भारतमाला योजनेंतर्गत...
शेवगाव, पाथर्डीत शेळ्या-मेंढ्यांच्या...शेवगाव, जि. नगर : दुष्काळी परिस्थितीत सरकारने...
सांगलीचा प्रश्‍न दिल्लीदरबारीसांगली ः सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीला...