agriculture news in Marathi, fraud of 35 crore rupees in jalyukt shivar work in Beed District, Maharashtra | Agrowon

बीड जिल्ह्यात ‘जलयुक्त’च्या कामात ३५ कोटींचा घोटाळा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 6 मार्च 2018

पुणे : कृषी खात्यातील अधिकारी व कंत्राटदारांनी बीड जिल्ह्यात संगनमताने जलयुक्त शिवाराच्या कामांमध्ये ३५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा संशय आहे. कृषी आयुक्तांनी या घोटाळ्याची गंभीर दखल घेत गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत असलेल्या या ‘सोनेरी’ टोळीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

पुणे : कृषी खात्यातील अधिकारी व कंत्राटदारांनी बीड जिल्ह्यात संगनमताने जलयुक्त शिवाराच्या कामांमध्ये ३५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा संशय आहे. कृषी आयुक्तांनी या घोटाळ्याची गंभीर दखल घेत गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत असलेल्या या ‘सोनेरी’ टोळीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

घोटाळा दडपण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून अधिकाऱ्यांची लॉबी कार्यरत होती. मात्र, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी मंत्रालयापर्यंत जोरदार पाठपुरावा केल्यामुळे चौकशीची सूत्रे वेगाने फिरली. ‘या घोटाळ्याप्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही,’ अशी भूमिका कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी घेतली आहे. 

‘‘जलयुक्त शिवार कामांमध्ये घोटाळा करणाऱ्या सर्व भ्रष्ट अधिकारी व कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून १३ मार्चपर्यंत कृषी आयुक्तालयाकडे अहवाल सादर करा,’’ असे आदेश कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी दिले आहेत. घोटाळ्यात हडप झालेल्या निधीपैकी सध्या केवळ आठ कोटीची वसुली काढण्यात आली आहे. मात्र, एकूण घोटाळा ३५ कोटी रुपयांचा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

बीड जिल्ह्यातील बहुतेक कृषी कार्यालये गैरव्यवहारात गुंतलेली आहेत. निधी हडप करून काही अधिकाऱ्यांनी बदल्या तर काही अधिकाऱ्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. विशेष म्हणजे गैरव्यवहाराचा बोभाटा झालेल्या बीड जिल्ह्यासाठी अधीक्षक कृषी अधिकारी म्हणजेच ‘एसएओ’देखील प्राप्त होत नव्हता. 

‘एसएओ’ नसल्याने सोनेरी टोळीवर गुन्हा कोणी दाखल करायचा ही एक समस्या तयार झाली. आता आयुक्तांनीच यात लक्ष घालून एम. एल. चपले यांची ‘एसएओ’पदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता सोनेरी टोळीतील कोणते मासे पोलिसांच्या गळाला लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

जलयुक्त शिवारातील घोटाळा झाल्याचे सिद्ध झाल्यानंतरदेखील कंत्राटदार व कृषी खात्यातील सोनेरी टोळीकडून पुढील कारवाई टाळण्यासाठी पद्धतशीर लॉबिंग केले गेले होते. त्यामुळे श्री. मुंडे यांनी मंत्रालयात पत्रव्यवहार सुरू केला. मात्र, तेथेही चौकशीला संशयास्पदरीत्या उशीर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर श्री. मुंडे यांनी कृषी आयुक्तालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अधिकाऱ्यांची धावपळ झाली. 

‘‘कृषी आयुक्तांनी या घोटाळ्याची गंभीर दखल घेत फौदजारी कारवाईचा निर्णय घेतला आहे. कारवाईची माहिती देण्यासाठी कृषी खात्याचा एक खास कर्मचारी बीडमध्ये श्री. मुंडे यांच्याकडे पाठविण्यात आला. तसेच, औरंगाबादच्या कृषी सहसंचालकांनादेखील या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घडामोंडीमुळे श्री. मुंडे यांनीदेखील तूर्त आंदोलन मागे घेतले आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कृषी आयुक्तालयातील वरिष्ठांच्या म्हणण्यानुसार, या घोटाळ्याचा अहवाल हाती येताच कृषी आयुक्तांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश फेब्रुवारीमध्येच दिला होता. मात्र, पोलिसांनी टाळाटाळ केली. परळीचा तालुका कृषी अधिकारी गुन्हा दाखल करण्यासाठी घोटाळ्याची कागदपत्रे घेऊन परळी शहर पोलिस ठाण्यात गेला. मात्र, पोलिसांनी दाद दिली नव्हती. पोलिस ठाण्यात कृषी खात्याचा वरिष्ठ अधिकारी म्हणजेच ‘एसएओ’ गेल्याशिवाय पोलिस दाद देणार नाहीत, असे स्पष्ट झाले. त्यामुळे बीडसाठी तातडीने नवा ‘एसएओ’ नियुक्त करून गुन्हा दाखल करण्यात येणारे अडथळे दूर करून कृषी आयुक्तांनी कारवाईतील अडथळे दूर केले आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

निधी वसूल करण्यासाठी 'सहकार'-'कृषी' एकत्र
जलयुक्त शिवार अभियानाचा पैसा हडप करणाऱ्या कंत्राटदार व अधिकाऱ्यांकडून निधीची वसुली करण्यासाठी कृषी खाते व सहकार विभाग एकत्र आले आहेत. कृषी अधिकाऱ्यांनी सहकार विभागाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांशी संगनमत केले आहे. त्यामुळे कंत्राटदारांनी हडप केलेला निधी वसूल करण्यासाठी लातूरच्या विभागीय सहनिबंधकांची मदत घेतली जात आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. ​

असा झाला घोटाळा

  • कंत्राटदारांच्या सोयीसाठी कृषी अधिकाऱ्यांनी जलयुक्त शिवार अभियानात ई-निविदा प्रक्रियाच राबविली नाही.
  • कामाचे खोटे अहवाल देऊन कोट्यवधी रुपये हडप करण्यासाठी बिलेही खोटी तयार केली.
  • राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियानाबाबत दिलेल्या मार्गदर्शक नियमावलींचा वेळोवेळी भंग केला.
  • मजूर सहकारी संस्थांमार्फत बनावट कामे दाखविली.
  • जिल्हा नियोजन व विकास समितीने मंजूर केलेल्या कामांऐवजी भलत्याच कामांवर खर्च दाखवून निधी हडप केला गेला.
  • जलयुक्त शिवार आराखड्यात प्रस्तावित केलेली गावे वगळण्यात आली व इतर गावांमध्ये खर्च दाखविला गेला.
  • कंत्राटदारांच्या संगनमताने झालेल्या या घोटाळ्याची व्याप्ती मोठी. घोटाळ्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ), उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ (सर्कल) कृषी अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे अहवालात स्पष्ट नोंद. 

     

इतर अॅग्रो विशेष
दहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...
शेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...
कसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष? अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...
'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
पंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...
विविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
किमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...
जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।।जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।। पंढरीचा...
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी...तासगाव, जि. सांगली ः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ....
दीड हजार कोटींचा दुसरा हप्ता...मुंबई  ः गेल्या वर्षी खरीप हंगामात अपुऱ्या...
राज्यात गारठा पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह येऊ...
पंतप्रधान मोदी आज करणार महिला बचत...यवतमाळ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता...
पदव्युत्तर कृषी अभ्यासक्रमात पुढील...नागपूर ः कृषी अभ्यासक्रमात आजची परिस्थिती आणि...
दुष्काळात पीकविम्याचा आधारमुंबई ः यंदाच्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...
पाकच्या मुस्क्या आवळणार; विशेष राष्ट्र...नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ...
चीनमधील शेतीची विस्मयकारक प्रगतीविसाव्या शतकाच्या मध्यावर भारताला स्वातंत्र्य...
सेस, सेवाशुल्क आणि संभ्रमप्रक्रियायुक्त शेतमाल, फळे-भाजीपाला आणि शेवटी...
कृषी पथदर्शक राज्य साकारण्याची संधी :...पुणे : “शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक शेती तंत्र...
डिजिटल परवान्यासाठी लढा देणार : राजू...पुणे : कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाकडून...