agriculture news in marathi, Fraud of maka seed | Agrowon

मका बियाणे खरेदीत फसवणूक : शेतकऱ्याची तक्रार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 जून 2018

जळगाव  ः मका बियाण्यांसंबंधी फसवणूक झाल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागल्याची तक्रार गोद्री (ता. जामनेर, जि. जळगाव) येथील शेतकरी दिलीप गुमानसिंग पवार यांनी तहसीलदार व पंचायत समितीकडे केली आहे.

जळगाव  ः मका बियाण्यांसंबंधी फसवणूक झाल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागल्याची तक्रार गोद्री (ता. जामनेर, जि. जळगाव) येथील शेतकरी दिलीप गुमानसिंग पवार यांनी तहसीलदार व पंचायत समितीकडे केली आहे.

२७ मार्च रोजी जामनेरातील एका कृषी केंद्रातून स्वीट कॉर्न मक्‍याचे एक किलो बियाणे २२५० रुपयांना घेतले. त्याची दीड एकरात चार बाय पावणेचार फूट अंतरात ठिबकवर २८ मार्चला लागवड केली. मक्‍याची वाढ चांगली झाली. एका झाडाला चार कणसेही लागली, पण कणसात दाणे भरले नाहीत. एका कणसात फक्त पाच ते सहा दाणे आहेत. त्यानंतर कृषी केंद्रातूच खते व विद्राव्य खते घेतली. त्यासाठी किमान १५ हजार रुपये खर्च आला. याबाबतची तक्रार संबंधित बियाणे कंपनीकडे केली, पण कंपनीने आपला दोष नसून तो कृषी केंद्रचालकाचा आहे. केंद्रचालकास ते बियाणे विक्री न करण्याचे बजावले होते, असे बियाणे कंपनीच्या प्रतिनिधीने म्हटले आहे.

कृषी केंद्रचालकाकडे यासंदर्भात माहिती दिली, परंतु ते ही दखल घ्यायला तयार नाही. या प्रकारामुळे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभाग, तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. त्यांनी पाहणी करायचे आश्‍वासन दिले आहे. मक्‍याला दाणेच न लागल्याने अपेक्षित उत्पादन येणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी पवार यांनी केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...