agriculture news in marathi, fraud in seed distribution to farmers | Agrowon

बियाणेवाटपाच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून पैसे उकळले
टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

पुणे : ठेकेदारांशी संगनमत करून निकृष्ट दर्जाची खते शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या गळ्यात मारण्याचा प्रकार धुळे जिल्ह्यात उघडकीस आल्यानंतर आता बियाणे वाटपातदेखील गफला करण्यात आल्याची तक्रार धुळे जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनीच्या महासंघाने कृषी आयुक्तालयाकडे केली आहे. 

पुणे : ठेकेदारांशी संगनमत करून निकृष्ट दर्जाची खते शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या गळ्यात मारण्याचा प्रकार धुळे जिल्ह्यात उघडकीस आल्यानंतर आता बियाणे वाटपातदेखील गफला करण्यात आल्याची तक्रार धुळे जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनीच्या महासंघाने कृषी आयुक्तालयाकडे केली आहे. 

आत्माकडून पीक प्रात्यक्षिक योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांना बियाणे वाटली जातात. धुळे जिल्ह्यात ४४६ शेतकऱ्यांना कांदा बियाणे देतो, असे सांगून कृषी विभागाने बेकायदा प्रतिशेतकरी एक हजार रुपये गोळा केले आहेत, असे शेतकरी कंपन्यांचे म्हणणे आहे. 
भ्रष्ट अधिकारी राजरोस शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. साडेचार लाख रुपये बेकायदा शेतकऱ्यांकडून गोळा केलेले असताना वरिष्ठ अधिकारी एकमेकांना पाठीशी घालतात व तक्रार करण्यास गेलेल्या शेतकऱ्याला उलट खंडणीखोर अशी संभावना करतात.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आम्ही अनेक अधिकाऱ्यांच्या दारात गेल्यानंतर अजूनही न्याय मिळालेला नाही, असे महासंघाचे अध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील यांचे म्हणणे आहे. ‘पीक प्रात्यक्षिकांचे निविष्ठा कीट वाटण्यासाठी अनुदान ३५०५ रुपये आणि शेतकरी हिस्सा एक हजार रुपये, असे स्पष्टपणे नमूद करून त्याखाली पाच अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे पत्र जारी करण्यात आले. त्यानुसार शेतकऱ्यांकडून वसुलीदेखील करण्यात आली. आम्ही आवाज उठवल्यानंतर या शेतकऱ्यांची नावे माहितीच्या अधिकारातदेखील देण्यात आलेली नाही. पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्या कृषी खात्याला शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यास भीती का वाटते, असा सवालदेखील ॲड. पाटील यांनी उपस्थित केला आहे. 

दरम्यान, कृषी आयुक्तालयाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. "धुळे जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनीच्या महासंघाने केलेल्या तक्रारीची चौकशी सुरू आहे. यातील निष्कर्ष हाती आलेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणावर सध्या काहीही माहिती देता येणार नाही," असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

‘आम्हाला वाईट अनुभव’
पारदर्शकतेच्या बाता मारणारे अधिकारी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कार्यालयांमध्ये कसे अडवतात, याचा वाईट अनुभव आम्हाला आला आहे, असे सांगून अॅड. पाटील म्हणाले की, “आत्मा सहसंचालकांकडे आम्ही पुराव्यासह तक्रार केल्यानंतर ‘चौकशी करतो’ असे उत्तर मिळाले. नाशिक कृषी सहसंचालकांकडे गेल्यानंतर ‘तुम्ही या भानगडीत कशाला पडता, सर्व शेतकऱ्यांना तक्रार करू द्या’, असे उत्तर मिळाले. यामुळे विभागीय आयुक्तांना भेटलो. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले. जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा आम्हाला कृषी विभागाकडे जाण्याचा सल्ला दिला. ‘जिल्हाधिकारी हेच आत्माचे प्रमुख आहेत. त्यामुळे तुम्ही आम्हाला न्याय द्या,’ असे शेतकऱ्यांनी सांगितल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ‘मी अभ्यास करून निर्णय घेतो,’ असे उत्तर दिले.

इतर अॅग्रो विशेष
जपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...
सांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...
अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...
अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे  ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...
दुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई   ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
पडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...