बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन खरेदी अत्यल्प
बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन खरेदी अत्यल्प

बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन खरेदी अत्यल्प

बुलडाणा : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सुरू केलेल्या खरेदी केंद्रावर या हंगामात शेतीमालाची अत्यल्प अावक अाहे. प्रामुख्याने सोयाबीनची अातापर्यंत ५०० क्विंटलही खरेदी झाली नाही. २६ शेतकऱ्यांची ३८५ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात अाली. 

अाजवर अाधारभूत किमतीत शेतीमाल खरेदीसाठी केंद्रावर रांगा लागलेल्या बघायला मिळत होत्या. यंदा प्रथमच कुठल्याही केंद्रावर गर्दी नाही. जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत खरेदी केंद्रावर मूग, उडीद, सोयाबीन या तीनही धान्याची अल्प खरेदी झाली. २२१६ शेतकऱ्यांनी १६ हजार १२ क्विंटल मूग, तर १५५४ शेतकऱ्यांनी १० हजार ८७५ क्विंटल उडीद विक्री केला. सोयाबीन विक्रीला सर्वांत कमी प्रतिसाद आहे. सोयाबीनला बाजारपेठेत हमीभावाच्या बरोबरीने दर आहेत. त्यामुळे असे झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे अाहे.

शासनाने शेतीमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांना अाॅनलाईन नावनोंदणी करण्यास सांगितले. शेतकऱ्यांनी नोंदणी केली. मात्र शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी या केंद्रांकडे फिरकत नसल्याची स्थिती आहे. शासनाकडून नावनोंदणी प्रक्रियेसाठी वेळोवेळी मुदतवाढसुद्धा देण्यात अाली. त्याचाही फारसा फरक पडला नाही.  

शासकीय खरेदी केंद्रावरील गर्दी, चुकारे मिळण्यास होणारा विलंब, असे प्रकार यापूर्वी सर्रास व्हायचे. गेल्या हंगामात शेतीमाल विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे  पैसे अद्यापपर्यंत खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होती. या अनुभवांमुळे आणि शेतीमालाची उत्पादकता जिल्ह्यात घटली असल्याचा परिणाही या अल्प प्रतिसादामागे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com