agriculture news in marathi, Free the way for power connections to 30,000 farmers in the Nashik region | Agrowon

नाशिक : ३० हजार शेतकऱ्यांचा वीजजोडण्यांचा मार्ग मोकळा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 जून 2018

नाशिक : कोटेशन भरूनही कृषिपंपाची वीजजोडणी प्रलंबित असलेल्या नाशिक परिमंडळातील जवळपास ३० हजार शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे (हाय व्होल्टेज डिस्ट्रिब्यूशन सिस्टिम) वीजजोडणी देण्यासाठी निविदा प्रक्रिया त्वरित राबविण्याचे आदेश मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी दिले आहेत.

नाशिक : कोटेशन भरूनही कृषिपंपाची वीजजोडणी प्रलंबित असलेल्या नाशिक परिमंडळातील जवळपास ३० हजार शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे (हाय व्होल्टेज डिस्ट्रिब्यूशन सिस्टिम) वीजजोडणी देण्यासाठी निविदा प्रक्रिया त्वरित राबविण्याचे आदेश मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी दिले आहेत.

या योजनेतून परिमंडळात जवळपास ७०० कोटी रुपयांची कामे होणार आहेत. एका जोडणीसाठी २ लाख ५० हजार रुपयांपर्यंतच्या खर्चाची तरतूद असून, १४ वीज उपकेंद्रांची उभारणीही प्रस्तावित आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी ''एचव्हीडीएस''मधून होणाऱ्या कामांना गती देण्याच्या सूचना गुरुवारी दिल्या होत्या. १५ ऑगस्टपासून योजनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचनाही केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर परिमंडळ कार्यालयात आयोजित अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांच्या बैठकीत जनवीर यांनी शुक्रवारी हे आदेश दिले.

मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून वीजजोडणी प्रलंबित असलेल्या राज्यभरातील अडीच लाख शेतीपंपांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे जोडणी देण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेतून होणाऱ्या कामांचा नाशिक परिमंडळातील २९ हजार ९४१ शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. या योजनेत एक किंवा दोन कृषिपंप वीजजोडणीसाठी १०, १६ किंवा २५ किलो व्हाेल्टचे स्वतंत्र रोहित्र (डीपी) उभाण्यात येणार असल्याने वीजगळती व चोरीला आळा बसण्यास हातभार लागणार आहे. उपलब्ध मनुष्यबळाचा सुयोग्य वापर करून आवश्यक ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी व उपविभागनिहाय निविदा त्वरित काढाव्यात, असे आदेश जनवीर यांनी दिले आहेत.

...तर कारवाईला सामोरे जा!
वीजबिलांची शंभर टक्के वसुली, वीजचोरीविरोधात कारवाई, थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडणे, नादुरुस्त मीटर बदलणे आदी कामे प्राधान्याने करावीत. या कामांबाबत लक्ष्य निर्धारित करून उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य उपयोग करावा. या कामांमध्ये कुचराई करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी; अन्यथा स्वतः कारवाईस तयार राहावे, असा इशारा जनवीर यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिला. या वेळी नाशिक शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता सुनील पावडे, मालेगाव मंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता दरवडे, अहमदनगर मंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता जीवन चव्हाण यांच्यासह सर्व विभागांचे कार्यकारी अभियंते उपस्थित होते.

वीजजोडण्यांची सद्यःस्थिती
नाशिक शहर मंडळ : नाशिक शहर विभाग दोन- ३५१, नाशिक ग्रामीण विभाग- २८२७९, चांदवड विभाग- २७६५
मालेगाव मंडळ : कळवण विभाग- २७१, मालेगाव विभाग- २३४०, मनमाड विभाग- ६३४६, सटाणा विभाग- २८७४

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...