सोलापुरात घेवडा, काकडीची आवक घटली

घेवडा
घेवडा

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरवी मिरची, घेवडा, काकडीचे दर काहीसे वधारले. त्यांची आवक तुलनेने कमी राहिली. पण मागणी स्थिर असल्याने दरही वधारल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.  बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरवी मिरचीची आवक ३० ते ५० क्विंटपर्यंत राहिली. घेवड्याची ५ ते १० क्विंटल आणि काकडीची १० ते २० क्विंटल आवक झाली. ही सगळी आवक स्थानिक भागातूनच झाली. बाहेरील आवक कमीच होती. हिरव्या मिरचीची आवक तेवढी उस्मानाबाद भागातून झाली. हिरव्या मिरचीला प्रतिदहा किलोसाठी १५० ते २८० व सरासरी २०० रुपये, घेवड्याला २०० ते ३०० व सरासरी २५० रुपये तर काकडीला ८० ते ३०० व सरासरी १५० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय गाजराचीही आवक बऱ्यापैकी झाली. रोज किमान १०० ते २०० क्विंटलपर्यंत आवक होती. त्यालाही मागणी चांगली होती. गाजराला प्रतिदहा किलोस १५० ते ३०० व सरासरी २०० रुपयांपर्यंत दर होता. गवार, भेंडीलाही उठाव मिळाला. त्यांची आवकही प्रत्येकी २० ते ३० क्विंटपर्यंत राहिली. गवारला प्रतिदहा किलोस २०० ते ३५० रुपये आणि भेंडीला २०० ते ३०० रुपये इतका दर मिळाला. या सप्ताहात कांद्याची आवक रोज २०० ते ३०० गाड्यापर्यत झाली. या आधीच्या सप्ताहाच्या तुलनेत आवकेत काहीशी घट झाली. पण मागणी टिकूनच होती. त्यामुळे दरात आणखी वाढ झाली. कांद्याला २०० ते ३८०० व सरासरी २१०० रुपये असा दर मिळाला.  अर्ली द्राक्ष बाजारात  अर्ली हंगामातील द्राक्ष बाजारात येत असून, रोज किमान ४०० ते ५०० क्विंटलपर्यंत त्याची आवक आहे. जिल्ह्यातील आवक कमीच आहे, नजीकच्या सांगली आणि उस्मानाबाद भागातून काही प्रमाणात ही आवक होते आहे. दरही काहीसे स्थिर आहेत. द्राक्षाला प्रतिचार किलोच्या पेटीला ७० ते १२० व सरासरी ९० रुपये असा दर मिळतो आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com