agriculture news in Marathi, friends help family after accidental death of friend, Maharashtra | Agrowon

कृषिमित्राच्या अपघाती निधनानंतर कुटुंबीयांच्या मदतीसाठी धावले मित्र!
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 जानेवारी 2018

करमाळा येथे तलाठी असलेला आमचा कृषिमित्र समाधान देसाई अपघातात गेला. त्याच्यानंतर कुटुंबीयांना आधार मिळावा म्हणून आम्ही सर्वांनी मुलाच्या नावाने बॅंकेत ठेव आणि भावाच्या शिक्षणासाठी मदत केली. रस्ते अपघातावर नियंत्रण यावे यासाठी आम्ही प्रबोधनही करतोय. 
- विजयानंद विधाते-पाटील, सहायक पोलिस निरीक्षक, सोलापूर

सोलापूर: कृषी पदवी घेऊन तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या समाधान देसाई यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. या निधनानंतर देसाई यांच्या कुटुंबीयांवर आभाळ कोसळले, पण २००२ मध्ये कृषी पदवी घेतलेल्या समाधानच्या त्या वेळच्या कृषिमित्रांनी एकत्र येऊन कुटुंबीयांना मदतीचा हात दिला.

सोलापुरात सहायक पोलिस निरीक्षक असलेल्या कृषिमित्र विजयानंद विधाते-पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकारातून समाधान यांच्या दोन महिन्यांच्या मुलाच्या नावे बॅंकेत ५० हजारांची ठेव आणि भावाच्या शिक्षणासाठी १० हजारांचा धनादेश देण्यात आला. कृषिमित्रांनी आपल्या मित्राच्या कुटुंबीयांसाठी पुढे केलेल्या या मदतीने या मित्रांचे कौतुक होत आहे. 

कारी (ता. बार्शी) येथील समाधान देसाई हे करमाळा येथे तलाठी पदावर कार्यरत होते. ३ डिसेंबर २०१७ रोजी दुचाकीवरून कामावर जाताना ट्रकच्या धडकेने देसाई यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देसाई कुटुंबीयांवर दु:खाचा    डोंगर कोसळला. घरातला कर्ता माणूस गेल्याने देसाई यांच्या मुलाच्या भविष्याचा आणि देसाई यांच्या भावाच्या शिक्षणाचा प्रश्‍न उभा राहिला. कारी येथील कृषिमित्र, सोलापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विजयानंद विधाते-पाटील यांनी वेळ न दवडता देसाई कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. 

कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयात २००२ मध्ये कृषी पदवी घेतलेल्या कृषिमित्रांशी विधाते-पाटील यांनी संपर्क केला. राज्यभरात विविध पदांवर कार्यरत असलेल्या कृषिमित्रांनी आपापल्या परीने देसाई कुटुंबीयांसाठी मदतीचा हात दिला आणि बघताबघता ६० हजार रुपये जमा झाले. त्यानंतर गेल्या आठवड्यात सहायक पोलिस निरीक्षक विधाते-पाटील यांनी   देसाई यांच्या घरी जाऊन त्यांच्या लहान मुलाच्या नावे फिक्‍स्ड डिपॉझिट  ठेवण्यासाठी ५० हजार रुपये आणि भाऊ अक्षयच्या शिक्षणासाठी १० हजारांचा धनादेश दिला. 

या वेळी सरपंच खासेराव विधाते, ग्रामपंचायत सदस्य डॉ. देवेंद्र डोके, परीक्षित विधाते, सचिन पाटील, राजेश पवार आदी उपस्थित होते. 

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...