एफआरपीप्रमाणे ऊस बिलासाठी परभणीत शेतकरी संघटनेचे धरणे

एफआरपीप्रमाणे ऊस बिलासाठी परभणीत शेतकरी संघटनेचे धरणे
एफआरपीप्रमाणे ऊस बिलासाठी परभणीत शेतकरी संघटनेचे धरणे

परभणी ः जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीनुसार ऊस बिल द्यावे. गतवर्षीच्या थकीत ऊस बिलाची रक्कम व्याजासह द्यावी, आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी (ता. १९) जिल्हाधिकारी कार्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २०१७-१८ च्या गाळप हंगामातील ऊस बिल एफआरपीप्रमाणे मिळाले नाही. यंदाचा २०१८-१९ चा गाळप हंगाम सुरू झाला आहे. परंतु एकाही साखर कारखान्याने एफआरपीप्रमाणे दर जाहीर केलेला नाही. गतवर्षीच्या गाळप हंगामातील ऊस बिल देताना शेतकऱ्यांना कमी अधिक रक्कम देऊन पक्षपात करण्यात आला.

थकीत ऊस बिलाची रक्कम व्याजासह देण्यात यावी. सर्व साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार ऊस बिल द्यावे, या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या धरणे आंदोलनामध्ये शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, मराठवाडा अध्यक्ष बंडु सोळंके, जिल्हाध्यक्ष माउली कदम, माउली जोगदंड, अनंत कदम, मुंजाभाऊ कदम, विश्वंभर गोरवे, लहुजी शेळके, गोविंद जबडे, माधव शेळके, किरण चक्रपाणी, त्र्यंबक सुरवसे आदीसह शेतकरी सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com