agriculture news in marathi, frp issue continue, satara, maharashtra | Agrowon

शिल्लक एफआरपी मिळत नसल्याने साताऱ्यातील शेतकरी अस्वस्थ
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 एप्रिल 2019

सातारा  : अजिंक्यतारा कारखान्याचा अपवाद वगळता इतर कोणत्याही कारखान्याने एफआरपी रक्कम पूर्ण दिलेली नाही. किमान विक्री मूल्यात वाढ करूनही उर्वरित एफआरपीची रक्कम देण्याबाबत कारखान्यांकडून कोणत्याही हालचाली दिसत नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांत अस्वस्थता पसरली आहे. 

सातारा  : अजिंक्यतारा कारखान्याचा अपवाद वगळता इतर कोणत्याही कारखान्याने एफआरपी रक्कम पूर्ण दिलेली नाही. किमान विक्री मूल्यात वाढ करूनही उर्वरित एफआरपीची रक्कम देण्याबाबत कारखान्यांकडून कोणत्याही हालचाली दिसत नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांत अस्वस्थता पसरली आहे. 

जिल्ह्यातील गाळप हंगाम संपला असून, कारखान्यांनी एक कोटी क्विंटलपेक्षा अधिक साखरनिर्मिती केली आहे. सलग दुसऱ्या वर्षी साखर निर्मिती कोटीवर झाली आहे. हंगामाच्या मध्यावर साखरेच्या दरातील घसरण झाल्यामुळे एफआरपीसाठी ८०-२० चे सूत्र स्वीकारले होते. या काळात ऊस तुटून जाणे गरजेचे असल्यामुळे शेतकऱ्यांनी हे स्वीकारत कारखान्यांस ऊस दिला. त्यानंतर केंद्र शासनाने किमान विक्री मूल्य २९०० वरून ३१०० रुपये प्रतिक्विंटलवर नेले होते. या काळात साखरेची मागणी काहीशी कमी झाल्यामुळे कारखान्यांनी हाच दराचा फॉर्म्युला कायम ठेवला आहे. यामुळे पीककर्जाचे नवे जुने करण्यात शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. हंगाम संपल्यावर उर्वरित एफआरपी मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती.

हंगाम उरकून जवळपास तीन आठवडे झाले आहेत. मात्र, अजिंक्यतारा कारखान्यांचा अपवाद वगळता इतर कारखान्यांकडून कधी व किती हप्ता मिळणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. खरीप हंगाम तोंडावर आला असून, पुढील महिन्यात या हंगामाची कामे सुरू होतील. यामुळे उसाचा उर्वरित हप्ता मिळल्यास तो शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत बहुतांशी कारखानदार निवडणुकीत गुंतले होते. या मतदान झाले असल्याने उर्वरित एफआरपी देण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

अजिंक्यतारा कोंडी फोडणारा कारखाना
जिल्ह्यातील २०१८-१९ हंगाम सुरू होताना प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या बैठकीत पहिली उचल म्हणून एकरकमी एफआरपीस मान्यता देणारा कारखाना अजिंक्यतारा आहे. यानंतर साखरेच्या दरात घसरण झाल्यावर ८०-२० सूत्र स्वीकारत याच कारखाने पहिली उचल प्रतिटन २३०० रुपये दिली होती. हाच फॉर्म्युला जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी स्वीकारला होता. नुकतेच अजिंक्यतारा कारखान्याने कोंडी फोडत शिल्लक एफआरपीची प्रतिटन ५१५ रुपये बँकेत जमा केली आहे. हाच आदर्श इतर कारखान्यांनी स्वीकारण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या...फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील...
सावळी मोहितकर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून...नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर...
हळदीला १० हजार रुपये क्विंटल हमीभाव...नांदेड : राज्य आणि केंद्र सरकारने हमीभावाच्या...
चिखलीतील तेल्हारा धरणाच्या गेटदुरुस्तीस...बुलडाणा ः पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या चिखली...
गंगापुरात बनावट खतसाठा जप्तऔरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर येथील एका खत...
सहकार आयुक्तालयातील नियुक्त्यांचे घोळ...पुणे  : दुष्काळ, कर्जमाफी आणि घसरलेले...
संत्रा बाग वाळल्याने नयाखेडा येथील...अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या...
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
झाडावर नाही, काळजावर घाव पडतात नगर ः ‘‘दहा वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली...
सातारा जिल्ह्यात २५४ टँकरद्वारे...सातारा  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची...
नगरमधील शेतकऱ्यांना साडेचाळीस कोटींचे...नगर  ः सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल २००...
सांगलीत शेतकऱ्यांचा जनावरांसह मोर्चासांगली  : जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता...
वऱ्हाडात बाजी कुणाची?अकोला ः  लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही...
पुणे विभागात ‘जलयुक्त’ची आठ हजारांवर...पुणे : भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने...
नेता निवडीचा अधिकार राहुल गांधींनामुंबई  ः काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ नेता...
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...