agriculture news in marathi, frp issue solve, sangli, maharashtra | Agrowon

सांगलीत एकरकमी ‘एफआरपी’
टीम अॅग्रोवन
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

कडेगाव, जि सांगली  ः कोल्हापूर जिल्ह्याने ऊसदराबाबत घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर यंदाच्या गळीत हंगामात विनाकपात एकरकमी एफआरपी देण्याच्या कारखानदारांच्या शब्दावर विश्‍वास ठेवत सांगलीतील ऊसदर आंदोलन शनिवारी (ता. १०) मागे घेण्यात आले.

कडेगाव, जि सांगली  ः कोल्हापूर जिल्ह्याने ऊसदराबाबत घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर यंदाच्या गळीत हंगामात विनाकपात एकरकमी एफआरपी देण्याच्या कारखानदारांच्या शब्दावर विश्‍वास ठेवत सांगलीतील ऊसदर आंदोलन शनिवारी (ता. १०) मागे घेण्यात आले.

येथील सोनहिरा साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सांगली जिल्ह्यातील कारखानदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बैठक झाली. या वेळी `स्वाभिमानी` च्या नेत्यांनी ‘एफआरपी एकरकमीच’ हा शब्द घेण्यात यश मिळवले. तथापि, त्यावर अधिक दोनशे रुपयांच्या मागणीवरून त्यांनी माघार घेतली. साखरेला जादा दर मिळाल्यास दोनशे रुपये देऊ, असे आश्‍वासन कारखानदारांच्या वतीने देण्यात आले. त्यामुळे आंदोलन चिघळण्याआधीच चर्चेद्वारे तोडगा काढल्याने गाळप हंगाम सुरळीत करण्याचा कारखानदारांचा मार्ग मोकळा झाला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदरासाठी ‘चक्का जाम’ आंदोलन जाहीर केले होते. कोल्हापूर जिल्ह्यापुरते आंदोलन शनिवारच्या बैठकीनंतर मागे घेतले गेले. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील आंदोलनाकडे सर्वांचेच लक्ष होते. पंधरा दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील बंद असलेले सर्व कारखाने सोमवारपासून (ता. ११) सुरू होतील. मात्र सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने दमछाक करीत सुरू ठेवले गेले होते. शनिवारी सायंकाळी झालेल्या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील गाळप हंगाम सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

सांगली जिल्ह्यातील कारखान्यांच्या क्षमतेनुसार कारखान्यांकडून प्रतिटन २८०० ते ३००० रुपये एकरकमी एफआरपी मिळेल असे सर्वसाधारण चित्र आहे. दरम्यान, कोल्हापूरचा निर्णय झाल्यानंतर त्याच निर्णयाची सांगलीत पुनरावृत्ती होत असते. या अनुभवामुळे सांगलीतील बैठकीबाबत केवळ औपचारिकता उरली होती. खासदार राजू शेट्टी बैठकीसाठी उपस्थित नव्हते. ‘सोनहिरा’चे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम, ‘क्रांती’चे अरुण लाड, ‘विश्‍वास’चे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी चर्चेत भाग घेतला.

गेल्या पंधरा दिवसांपासून हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू झाला नव्हता. ‘स्वाभिमानी’सह शेतकरी संघटनांनी कारखान्यांची वाहने, गट कार्यालयावर हल्ले केले होते. गावबंद व ‘चक्का जाम’मुळे सर्वत्र अडचणीची स्थिती निर्माण झाली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साडेनऊचा एफआरपी बेस करून एफआरपी अधिक रुपये २०० रुपये अशा दराची मागणी केली होती. ही मागणी मान्य होईपर्यंत ऊसतोडण्या बंद करण्याचा इशारा दिला होता. मात्र एकरकमी एफआरपीवर तडजोड झाली. मात्र या वेळी दहा टक्के उतारा ग्राह्य धरून शासनाने एफआरपी निश्‍चित केली असल्याने शेतकऱ्यांच्या हाती नवे काही पडले नाही. उलट काहीसा तोटाच झाल्याचे एकूण चित्र आहे.

इतर ताज्या घडामोडी
बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...
प्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...
ऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...
नामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...
वजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...
कोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...
हमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...
रताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...
औरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...
मराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...
तुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...
टँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...
दिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...
सातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...
नाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...
कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...