सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने शेतकऱ्यांना एफआरपी कधी देणार

गाळप हंगाम
गाळप हंगाम

सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली नाही. तरीही कारवाई करण्यासाठी प्रशासन चालढकल करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. जिल्हाधिकारी यांनी एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अद्यापही कारवाई झालेली नाही, त्यामुळे साखर कारखान्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. सांगलीचा श्री दत्त इंडिया, शिराळ्याचा विश्वास आणि निनाईदेवी-दालमिया शुगरने एकरकमी एफआरपीची जमा केली; मात्र राजारामबापू, क्रांती, हुतात्मा, सोनहिरा, मोहनराव शिंदे, उदगिरी या कारखान्यांनी अद्याप एकरकमी एफआरपी दिली नाही.   यंदाच्या हंगामात सर्व कारखानदारांनी एकरकमी एफआरपीस टाळाटाळ केली आहे. कारखान्यांनी पहिला हप्ता २३०० रुपये दिला. एकरकमी एफआरपीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ३९ कारखान्यांवर कारवाईचे आदेश दिले. त्यात जिल्ह्यातील पाच कारखाने होते. जिल्हाधिकाऱ्यांनीही एफआरपी नोटीस बजावल्या. यापैकी दत्त, विश्वास, दालमिया कारखान्यांनी बुधवारी एफआरपीची उर्वरित रक्कम भरली. अद्यापही महांकाली, केन ॲग्रोने फरक दिला नाही.  स्वाभिमानीचा आंदोलनाचा इशारा नऊ साखर कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिलेली नसल्याचे स्पष्ट झाले. या कारखान्यांनी ऊस दर नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले असताना, अद्याप त्यांच्यावर कारवाईच्या नोटिसा देण्यात आल्या नाहीत. हे सर्व कारखाने वजनदार नेत्यांचे आहेत. त्यामुळे कारवाईस टाळाटाळ करण्यात आली. उर्वरित सर्व कारखान्यांनी एफआरपीच्या फरकाची बिले तातडीने द्यावीत, अन्यथा त्यांच्यावर मालमत्ता जप्तीच्या कारवाईसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रशासनही बड्या वजनदार नेत्यांचे कारखाने असल्यामुळे दबावात असल्याचे दिसत आहे, मात्र आम्ही एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.''

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com