agriculture news in marathi, frp problem will be solved of twenty sugar factories, pune, maharashtra | Agrowon

वीस कारखान्यांच्या ‘एफआरपी’चा तिढा सुटणार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

एफआरपी देण्यासाठी साखर आयुक्तालयाने चुकीच्या पद्धतीने मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजावल्या. आमच्या नॅचरल शुगरलादेखील १६ कोटीची चुकीची नोटीस काढल्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता केंद्र शासनानेच बाजू स्पष्ट केली आहे. त्यामुळे आयुक्तालयाने मनमानीपणे केलेली सर्व कारखान्यांवरील कारवाई तात्काळ मागे घ्यावी.
-  बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा)

पुणे  : उसाच्या एफआरपी वसुलीसाठी चुकीची पद्धत वापरली गेल्याचा मुद्दा केंद्र सरकारने ग्राह्य धरल्यामुळे राज्यातील २० साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे थकीत एफआरपीप्रकरणी या कारखान्यांना साखर आयुक्तालयाकडून बजावलेल्या मालमत्ता जप्तीच्या नोटिसा मागे घेतल्या जाण्याची शक्यता आहे.

राज्यातील साखर कारखान्यांनी २०१७-१८ मध्ये ऊस गाळप केल्यानंतर शेतकऱ्यांना एफआरपीपोटी २१ हजार २५१ कोटी रुपयांचे वाटप करणे अपेक्षित होते. मात्र, सध्या ५१ कारखान्यांकडे ४३७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यातील काही कारखान्यांना मालमत्ता जप्तीच्या (आरआरसी) नोटिसादेखील बजावण्यात आलेल्या आहेत.

प्रत्येक कारखान्याची वैयक्तिक एफआरपी काढली जाते. त्यासाठी मागील गाळप हंगामाचा उतारा गृहीत धरला जातो. राज्यातील २० साखर कारखान्यांनी २०१६-१७ गाळप घेतले, पण त्यांनी २०१५-१६ मधील हंगाम मात्र बंद ठेवला होता. त्यामुळे मागील वर्षाचा उतारा गृहीत धरता येणार नाही, असा युक्तिवाद या कारखान्यांचा होता.

`आम्ही २०१६-१७ च्या हंगामात गाळप केलेले नाही. त्यामुळे २०१५-१६ या हंगामातील हिशेब गृहित धरून एफआरपी काढावी, अशी मागणी आम्ही साखर आयुक्तालयाकडे केली होती. ती फेटाळण्यात आली. त्यामुळे आमच्यावरील कारवाई बेकायदा आणि अयोग्य असल्याची तक्रार केली होती,` असे कारखान्यांच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

साखर आयुक्तालयाने याबाबत १९ जुलै २०१८ रोजी केंद्रीय अन्न मंत्रालयाला पत्र लिहून मार्गदर्शन मागितले. अन्न मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव जितेंदर जुएल यांनी ७ सप्टेंबर २०१८ रोजी साखर आयुक्तालयाला पत्र पाठवून साखर कारखान्यांची मागणी रास्त असल्याचे स्पष्ट केले. `हंगाम बंद असलेल्या आधीच्या वर्षाचा उतारा किंवा बंद हंगामातील त्या जिल्ह्यातील चालू कारखान्यांचा सरासरी उतारा गृहीत धरून यापैकी जो उतारा जादा असेल तो ग्राह्य धरून एफआरपी काढावी,` असे नमूद करण्यात आले आहे.

`आम्ही २०१५-१६ चा हिशेब गृहीत धरून शेतकऱ्यांना पेमेंटदेखील केलेले आहे. मात्र, साखर आयुक्तालयाने २०१७-१८ च्या हंगामातील हिशेबावर आधारित पेमेंट करण्याचा चुकीचा आग्रह केला गेला. केंद्र शासनाच्या पत्रामुळे आमची बाजू योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे,` असे कारखान्यांच्या सूत्रांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
तुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...
सूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
ठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर  ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...
महिला बचत गटाने सुरू केली बियाणे बँकपाटीलवाडी (धामणवन) (ता. अकोले, जि. नगर) या...
शेती अन् ग्रामविकासासाठी आलो एकत्रअकोला शहरात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांनी...
थेट शेतीमाल विक्री ठरली नावापुरतीचपुणे  ः फळे भाजीपाला नियमनमुक्तीनंतर शेतकरी...
‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रासाठी...जळगाव  ः खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीसंबंधी...
गटशेतीला प्रोत्साहनासाठी निकषांत बदलपुणे : राज्याच्या गटशेती धोरणाला आलेली मरगळ...
जळगावला ‘हीट’चा चटका ः पारा ३८ अंशांवरपुणे : राज्यात ऑक्टोबर हीटच्या चटक्यात जळगाव...
संकटातील सूतगिरण्यांना वीज दरवाढीचा...कोल्हापूर : महावितरणने वीज दरवाढीचा बडगा...
उसाच्या जनुकीय संरचनेतून उलगडली अनेक...गेल्या अनेक शतकांपासून ऊस हे पीक साखरेसोबतच...
दुर्गम सातपुड्यात नवतंत्रज्ञानाचा...नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतातील दुर्गम धनाजे...
‘ब्रॉयलर’ संगोपनासोबत भक्कम विक्री...नांदेड जिल्ह्यातील झरी (ता. लोहा) येथील मारुतीराव...
चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्यास सुरवातपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले तितली...
टेंभू योजनेचे पाणी घाटमाथ्यावर कधी येणारसांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी...