फळ पीकविम्याकडे पुण्यातील शेतकऱ्यांनी फिरवली पाठ
संदीप नवले
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

पुणे  : यंदा खरीप हंगामात मृग बहरासाठी शासनामार्फत पुनर्रचित हवामान आधारित पीकविमा योजना राबविण्यात आली होती; परंतु या विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे.
फळ पीकविमा योजनेत अवघे १५४३ शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यांनी ६२ लाख ७४ हजार ७८५ रक्कम भरली असून शंभर टक्के नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना १२ कोटी ६१ लाख ५५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.

पुणे  : यंदा खरीप हंगामात मृग बहरासाठी शासनामार्फत पुनर्रचित हवामान आधारित पीकविमा योजना राबविण्यात आली होती; परंतु या विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे.
फळ पीकविमा योजनेत अवघे १५४३ शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यांनी ६२ लाख ७४ हजार ७८५ रक्कम भरली असून शंभर टक्के नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना १२ कोटी ६१ लाख ५५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या फळबागांना विमासंरक्षण देणे हा मुख्य उद्देश या योजनेचा होता. त्यासाठी डाळिंब, पेरू, चिकू या पिकांसाठी अधिसूचित केलेल्या महसूल मंडळांमध्ये योजना राबविण्यात आली होती. डाळिंबासाठी १४ जुलै, पेरूसाठी १४ जून, चिकूसाठी ३० जून ही अंतिम मुदत होती. यंदा डाळिंबासाठी साडेपाच हजार, पेरू व चिकूसाठी अडीच हजार रुपयांचा विमा हप्ता ठरविण्यात आला होता. डाळिंब, पेरू आणि चिकूचे नुकसान झाल्यानंतर डाळिंबासाठी एक लाख १० हजार, पेरूसाठी ५० हजार, चिकूसाठी दोन लाख ४३ हजार रुपयांचे विमा संरक्षित रक्कम देण्यात येणार आहे.

योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी अनिवार्य, बिगर कर्जदार शेतकऱ्यासाठी ऐच्छिक स्वरूपाची होती. परंतु दरवर्षी विमा हप्ता भरूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नसल्याकारणाने यंदा बहुतांशी शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरलेला नाही. त्यातच विमा रक्कम भरण्यासाठी असलेल्या अडचणी, कमी कालावधी असल्याने बहुतांशी शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहिल्याचे चित्र आहे.  

चालू वर्षी हवेली, खेड, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी तालुक्यातील एकही शेतकरी सहभागी झालेला नाही; तर आंबेगाव, दौंड, इंदापूर तालुक्यातील सहभागी झालेल्या शेतकऱ्याची संख्या अवघी बोटावर मोजण्याएवढी आहे.

इतर बातम्या
नगर जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांना...नगर  : राज्यात कर्जमाफी मिळणारे सर्वाधिक...
राज्य सरकारचे धोरण शेतकरी हिताचे ः जानकरउस्मानाबाद  : राज्य सरकारचे धोरण...
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा...नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत...
सणाच्या दिवशी शेतकऱ्यांचे ठेचा भाकर...बुलडाणा : एेन सण काळात स्वाभिमानी शेतकरी...
शेतीपूरक व्यवसायाच्या आराखड्याचे काम...पुणे : शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असली तरी,...
औरंगाबाद येथे कर्जमाफी प्रमाणपत्राचे... औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्हाधिकारी...
देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी ः... सातारा  : शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस...
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी... हिंगोली : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा...
कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड ः... नांदेड : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
शासन शेतीमाल प्रक्रिया उद्योगांवर भर... जळगाव  ः शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी...
असंतोष विभागण्यासाठीच कर्जमाफीचे...मुंबई : सरकारने कर्जमाफीसाठी ज्या अटी- शर्ती लागू...
संत गजानन महाराज संस्थान करतेय...शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज...
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ४...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...जळगाव ः जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
जळगाव जिल्ह्यात दादर ज्वारी तरारली जळगाव  ः खानदेशात यंदा परतीच्या पावसामुळे...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
पीकविमा योजनेत पारदर्शकता आणा : द्राक्ष...नाशिक : सदोष पीकविमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ होत...