सीताफळाला फळमाशीचा डंख

सीताफळाच्या उशीराच्या वाणामध्ये हा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यात शेतकऱ्यांचे नुकसान होते आहे. आम्ही शासनाला अशा प्रसंगात मदतीसाठी पाठपुरावा करणार आहोत. - नवनाथ कसपटे, अध्यक्ष, अखिल भारतीय सीताफळ उत्पादक संघ,
सीताफळाला फळमाशीचा डंख
सीताफळाला फळमाशीचा डंख

सोलापूर ः कोरडवाहू शेतकऱ्यांचा आधार ठरू पाहणाऱ्या सीताफळामध्ये यंदाच्या हंगामात नैसर्गिक आपत्ती आली असून, गोडीस उतरलेल्या सीताफळाला फळमाश्‍या डंख लावत आहेत. राज्यातील सुमारे १५ हजार हेक्‍टरवरील सीताफळाच्या बागांवर या फळमाश्‍यांचा प्रादुर्भाव झाल्याचा अंदाज आहे. परिणामी, खराब फळामुळे सीताफळाचा बाजारही पुरता पडला असून, शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ सोसण्याची वेळ आली आहे.   सोलापूर, नगर, बीड, जालना, बुलडाणा या भागातील कोरडवाहू पट्ट्यात बहुतांश क्षेत्रावर सीताफळाची लागवड आहे. कमी खर्च आणि कमी पाण्यावर येणाऱ्या या फळामुळे गेल्या काही वर्षांत या भागातील शेतकरी सीताफळाकडे वळले आहेत. साहजिकच, त्यामुळे सीताफळाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढले. आजघडीला राज्यात सुमारे ७० हजार हेक्‍टरपर्यंत सीताफळाचे क्षेत्र आहे. चांदसिली, ऑटोमोया, ऍनोना-२, बाळानगरी, एनएमके-१, अर्कासहान यासारख्या विविध संकरित आणि निवड पद्धतीची वाणे राज्यात लागवड झालेली आहेत. साधारणपणे, जूनमध्ये सीताफळाचा बहार धरला जातो, पण यापैकी काही वाणांचे उत्पादन काहीसे उशिरा येते आणि यंदा नेमके उशीराने फळास आलेल्या सीताफळ वाणावरच ‘‘फळमाशी’ने घुसखोरी केली आहे. त्याची मोठी झळ शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे.

फळमाशीचा असाही प्रदुर्भाव ऑक्‍टोबर- नोव्हेंबर महिन्यात साधारण ऑक्‍टोबरहिट नंतर फळमाशीचा प्रादुर्भाव सर्वाधिक वाढतो. याच काळात उशिराच्या बहारातील गोडीस उतरलेल्या सीताफळावर ही फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. फळमाशी फळांमध्ये अंडी घालते. या अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या पल्प खातात आणि फळाचे पूर्ण शोषण करतात, परिणामी, फळ आतून सडून जाते.  दर्जा घसरल्याने बाजार पडला सीताफळासाठी मुंबई, पुणे या बाजारपेठा चांगल्या आहेत. या बाजारात सीताफळाला चांगला उठाव मिळतो, पण सडलेल्या, खराब झालेल्या सीताफळामुळे बाजार पुरता पडला आहे. सध्या सीताफळाला प्रतिकिलो सर्वाधिक १५० रुपये, सरासरी ७० रुपये आणि किमान ५० रुपये इतका दर आहे. एरवी याच हंगामात हा दर दुपटीने वाढलेला असतो. प्रतिक्रिया ऑक्‍टोबरहिटनंतर फळमाशीचा प्रादुर्भाव वाढतोच, त्यासाठी शेतकऱ्यांनी पहिल्यापासूनच कामगंध सापळ्याचा वापर केला पाहिजे. फळमाशीला रोखण्यासाठी आवश्‍यक त्या फवारण्या वेळीच केल्या तर ही समस्या येणार नाही. मुख्यतः उशीराच्या येणाऱ्या फळावरच त्याचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो. त्यादृष्टीने कीडरोगाचे नियंत्रण व्हायला हवे. - सुनील लाहोटे, सहाय्यक प्राध्यापक, अंजीर-सीताफळ संशोधन केंद्र, जाधववाडी (पुरंदर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com