गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ

गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ

नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव, रोगाचा वाढलेला प्रादुर्भाव व अधिक उत्पादन खर्च यामुळे गुलाब उत्पादक मोठ्या अडचणीत सापडला होता. मागील आठवड्यात पडलेली कडाक्‍याची थंडीमुळे गुलाबाची फुलवण लांबली. यामुळे बाजारातील आवक घटली. मात्र व्हॅलेंटाइन डेच्या निमित्त वाढलेल्या मागणीमुळे गुलाब उत्पादकांच्या कष्टाला फळ मिळाल्याचे चित्र आहे.

उत्तरेतून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांचा प्रतिकूल परिणाम जिल्ह्यातील जानोरी, मोहाडी परिसरात गुलाबाच्या शेतीवर झाला. वाढलेल्या रोगांमुळे  उत्पादकांच्या खर्चात वाढ झाली. कळ्यांची योग्य वाढ झाली नसल्याने उत्पादन घटले. त्यामुळे गुलाबाची आवक  घटल्याने फुलांचे बाजार वाढले. प्रतवारीनुसार प्रतिफूल ४ ते १० रुपयांचा दर मिळाला. मागील वर्षी हे दर २ ते ८ रुपये होते. 

जानोरी, मोहाडी, आंबे या परिसरात डच वाणाच्या टॉप सिक्रेट आणि बोर्डेक्‍सचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. व्हॅलेंटाइन डेसाठी असलेल्या गुलाबाची मागणी लक्षात घेऊन येथील उत्पादकांनी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रोपांचे कटिंग केले. त्यास फुटवे येऊन जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात फुलांच्या काढणीस सुरवात झाली. हा माल गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यांसह मुंबई, नागपुरात पाठविण्यात आला. 

मागील वर्षाच्या तुलनेत बाजारभाव 

वर्ष प्रती बंडल (रुपयांमध्ये)
२०१८ २०  ते ८०
२०१९  ४० ते १००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com