agriculture news in Marathi, fruit rot in graips in sangali District, Maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यात द्राक्षबागांमध्ये ५० टक्के फळकूज
अभिजित डाके
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

खानापूर घाटमाथ्यावर रिमझिम पावसामुळे फळगळ आणि फळकूज मोठ्या प्रमाणात झाली आहे. दिवसेंदिवस खर्चात वाढ होत आहे. दिवाळीही बागेतच साजरी करावी लागली. 
- अरविंद पाटील, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक, पळशी, जि. सांगली.

सांगली ः परतीच्या पावसाने द्राक्ष उत्पादकांना चांगलाच फटका बसला. द्राक्षावर डाउनीचा प्रादुर्भाव झाला. डाउनी कमी होत असतानाच सततच्या पावसाने द्राक्ष घडांमध्ये पाणी साचून राहिल्याने सुमारे ५० टक्क्यांहून अधिक फळकूज झाली. यामुळे उत्पादनात सुमारे ३० टक्के घट होण्याचा प्राथमिक अंदाज आहे.

त्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 
सांगली जिल्ह्यात सुमारे १ लाख एकर द्राक्षाचे क्षेत्र आहे. सुमारे पन्नास टक्के शेतकऱ्यांनी आगाप फळछाटणी घेतली आहे. त्यातच पोंगा अवस्थेत असताना द्राक्षबागांवर डाउनी रोगाचा प्रादुर्भाव झाला.

शेतकऱ्यांनी फवारणी केल्याने डाउनीचा प्रादुर्भाव काहीशा प्रमाणात कमी झाला असतानाच पंधरा दिवस झालेल्या पावसाने द्राक्ष उत्पादकांच्या कष्टावर पाणी फिरले. द्राक्ष मण्यांमध्ये पाणी साचून राहिल्याने फळकूज होण्यास प्रारंभ झाला. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. परिणामी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्‍यता आहे.

अस्मानी संकट आल्याने द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. आजअखेर प्रत्येक शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च केल्याने आर्थिक चणचण भासू लागली. आता आर्थिक तरतूद कशी करायच, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. अगोदर घेतलेल्या कर्जाची परतफेड झाली नाही. यामुळे बॅंका कर्ज देणार का, असा प्रश्‍न आहे. त्यामुळे खासगी सावकारांकडून कर्ज घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

उत्पादनात घटीची शक्‍यता
जिल्ह्यात एक लाख एकर द्राक्षाचे क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे ५० ते ६० टक्‍क्‍यांहून अधिक म्हणजे ५० हजार ते ६० हजार क्षेत्रामध्ये आगाप फळ छाटण्या झाल्या आहेत. त्यातील सुमारे ५० टक्के क्षेत्रात डाउनी, फळगळ आणि फळकूज याचा फटका बसला आहे. यामुळे या क्षेत्रातील द्राक्षाचे उत्पादन ३० टक्के घटण्याची शक्‍यता आहे. परिणामी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आजपर्यंत घातलेला खर्च मिळणे अवघड होणार आहे.

नुकसानीचे पंचनामे करा
द्राक्ष हे जिल्ह्यातील एकमेव नगदी पिक आहे. मात्र, या वेळी ऐन छाटणी आणि नंतरच्या काळात पावसामुळे द्राक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या द्राक्षबागेचे तात्काळ पंचनामे तत्काळ पंचनामे करावे, तसेच पर्जन्यमापन यंत्रे गावनिहाय बसवावे अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहेत. 

प्रतिक्रिया
माझी दहा एकर द्राक्षबाग आहे. त्यातील काही क्षेत्रात आगाप छाटणी घेतली आहे. एका एकरात ५० टक्के फळकूज झाली आहे. आता याची आर्थिक झळ सोसावी लागणार हे नक्की.
- भैया लांडगे, द्राक्ष उत्पादक, मणेराजुरी, जि. सांगली

द्राक्षबागेत पाणी साचल्याने आत्ताचे पीक येणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. पुढील वर्षी पीक घेण्यासाठी बाग जगविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यासाठी खर्च करावाच लागणार आहे.
- किरण भोसले, द्राक्ष उत्पादक, मळणगाव, जि. सांगली.

इतर अॅग्रो विशेष
रसायन विरहित फायद्याची शेती शक्य भारतात आज नेमकी सेंद्रिय व नैसर्गिक शेती...
राज्यातील जमिनीत जस्त, लोह, गंधक,...डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद...
केवळ जमीन आरोग्यपत्रिकेचा उपयोग नाही :...परभणी :जमीन आरोग्यपत्रिकेतील शिफारशीनुसार...
विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या...पुणे : विदर्भाच्या काही भागांत थंडीत वाढ झाली आहे...
मातीची हाक मातीचा कस घटल्यामुळे मरणपंथाला लागलेल्या जमिनी...
मातीच्या घनीकरणाने घटते उत्पादनजमीन खराब होण्याचे एक महत्त्वाचे कारण   ...
समजून घ्या जमिनीची आरोग्यपत्रिकाबऱ्याच शेतकऱ्यांकडे जमिनीची आरोग्यपत्रिका उपलब्ध...
सावधान, सुपीकता घटते आहे... पुणे : महाराष्ट्रातील भूभागाचे मोठ्या...
अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला जालन्यात...जालना : सर्वांची उत्सुकता लागून असलेल्या सकाळ-...
शून्य मशागत तंत्रातून कस वाढविला...मी १९७६ पासून आजपर्यंत जमिनीची सुपीकता...
सेंद्रिय कर्बावर अवलंबून जमिनीची सुपीकताजमिनीस भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म हे...
भूमिगत निचरा तंत्राद्वारे क्षारपड...सुरू उसात दक्षिण विभागात पहिला क्रमांक उरुण...
अतिपाण्यामुळे क्षारपड होतेय जमीनक्षारपड-पाणथळ जमिनीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी...
जैवइंधन, जैवखते, ठिबक उपकरणांच्या...२९ वस्तू आणि ५३ सेवांच्या जीएसटी दरामध्ये कपात...
प्रगतीच्या दिशेने पाऊलराज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेपासून ते १९९०...
सहकारी बॅंका डिजिटाइज केव्हा होणार?डिजिटल बॅंकिंग याचा अर्थ आधुनिक तंत्रज्ञानाच्या...
कारखाने, ऊस उत्पादकांचे नुकसान...नवी दिल्ली : साखरेच्या घाऊक दरात घसरण होऊनही...
इंडोनेशिया, चीनला द्राक्ष निर्यातीत...नाशिक : रशिया, चीन, इंडोनेशिया अशा काही देशांनी...
किमान तापमानाचा पारा वाढू लागलापुणे : दक्षिण कर्नाटकाच्या परिसरात चक्राकार...
कृषी संजीवनी प्रकल्पाची मंजुरी अंतिम...मुंबई : दुष्काळापासून शेतीचे संरक्षण आणि खारपाण...