agriculture news in Marathi, Fruitcake cultivation on 146 hectares under MNREGA in Parbhani district | Agrowon

परभणी जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत १४६ हेक्टरवर फळपीक लागवड
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 मार्च 2019

परभणी ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत यंदा जिल्ह्यात १ हजार ४५१ हेक्टरवर फळपीक लागवडीचे उद्दिष्ट होते, परंतु जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीमुळे फळपीक लागवडीसाठी पाणी उपलब्ध न झाल्यामुळे केवळ सात तालुक्यांमधील १८० शेतकऱ्यांनी १४६.३५ हेक्टरवर फळपीक लागवड केली. या संदर्भात कृषी विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली.

परभणी ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत यंदा जिल्ह्यात १ हजार ४५१ हेक्टरवर फळपीक लागवडीचे उद्दिष्ट होते, परंतु जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीमुळे फळपीक लागवडीसाठी पाणी उपलब्ध न झाल्यामुळे केवळ सात तालुक्यांमधील १८० शेतकऱ्यांनी १४६.३५ हेक्टरवर फळपीक लागवड केली. या संदर्भात कृषी विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली.

जिल्ह्यात यंदा विहित कालावधीत जिल्ह्यातील १ हजार ९३ शेतकऱ्यांनी ८३८.७० हेक्टरवर फळपीक लागवडीसाठी प्रस्ताव दाखल केले होते. त्यापैकी १ हजार ५९ शेतकऱ्यांच्या ८०६.६० हेक्टरवर फळपीक लागवडीसाठी तांत्रिक मान्यता देण्यात आली, परंतु ८१७ शेतकऱ्यांना ६२८.२० हेक्टरवर फळपीक लागडीसाठी मंजुरी देण्यात आली. फेब्रुवारीअखेर १८० शेतकऱ्यांनी १४६.३५ हेक्टरवर फळपीक लागवड केली आहे. 

परभणी तालुक्यात फळपीक लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक १३० असून, त्यांनी १०९.२० हेक्टरवर फळपीक लागवड केली आहे. जिंतूर आणि पूर्णा तालुक्यात मनरेगाअंतर्गत फळपीक लागवड झाली नाही. फळपिकनिहाय लागवड क्षेत्राचा विचार केला असता, संत्रा फळपिकाची सर्वाधिक ८२ शेतकऱ्यांनी ७९.७० हेक्टरवर लागवड केली. 

दुष्काळी स्थितीमुळे फळपीक लागवडीसाठी ८.९ हेक्टरवर खड्डे खोदलेल्या शेतकऱ्यांना लागवड करता आलेली नाही. प्रशासकीय मंजुरी दिलेल्या क्षेत्रापैकी ४८१.८५ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.

तालुकानिहाय लाभार्थी संख्या, फळबाग लागवड क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका लाभार्थी लागवड क्षेत्र
परभणी १३० १०९.२०
जिंतूर ०० ००
सेलू ०.४०
मानवत ३.६०
पाथरी १६ ९.५०
सोनपेठ २३ १७.८५
गंगाखेड २.०
पालम ३.८०
पूर्णा ०० ००

 

फळपीकनिहाय लागवड क्षेत्र (हेक्टरमध्ये)
फळपीक  लागवड क्षेत्र लाभार्थी
आंबा २१.४५ २८
चिकू १.५०
पेरू ४.९०
डाळिंब ५.८०
संत्रा ७९.७० ८२
मोसंबी १.५०
लिंबू २९.० ५०
सीताफळ २.५०

 

इतर ताज्या घडामोडी
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला चैत्री...सोलापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या चैत्री...
अकोला जगात ‘हॉट’ शहरांच्या यादीतअकोला : मागील दोन दिवसांपासून या भागात उष्णतेचे...
दुष्काळी भागात दाहकता वाढलीसावळज, जि. सांगली : कायमस्वरूपी दुष्काळी भाग...
विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या :...नाशिक : लोकसभेची ही निवडणूक विकासाची, सामान्य...
राहुल गांधी यांची आज संगमनेरात सभानगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काॅँग्रेसचे...
तयार करा सेंद्रिय निविष्ठाअलीकडे सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची...
रताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...
निवडणूक संपली, आता तरी दुष्काळी...सांगली ः लोकसभेची आचारसंहिता एक महिन्यापासून सुरू...
चौथ्या टप्प्यात १०९ कोट्यधीश उमेदवार...मुंबई ः राज्यातील चौथ्या टप्प्याची निवडणूक...
पुणे ः खरिपासाठी एक लाख ८५ हजार टन...पुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू...
राज्यात कलिंगड प्रतिक्विंटल ५०० ते २१००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते ११०० रुपये अकोला ः...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...