agriculture news in marathi, fuel hike is economic policy matter says high court | Agrowon

इंधनातील दरवाढ ही आर्थिक धोरणाचा भाग : उच्च न्यायालय
वृत्तसेवा
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली : इंधनाच्या दरात दररोज होणारा बदल हा केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणात्मक निर्णयाचा भाग असून, न्यायालय यात हस्तक्षेप करू करू शकत नाही, असे बुधवारी (ता.१२) दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजेंद्र मेनन आणि न्यायाधीश व्ही. के. राव यांच्या पीठाने सरकारच्या धोरणात्मक बाबीत हस्तक्षेपास नकार दिला. या निर्णयाशी आणखी काही मोठे आर्थिक मुद्दे निगडित असतात, असे न्यायालयाने म्हटले आहे.

नवी दिल्ली : इंधनाच्या दरात दररोज होणारा बदल हा केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणात्मक निर्णयाचा भाग असून, न्यायालय यात हस्तक्षेप करू करू शकत नाही, असे बुधवारी (ता.१२) दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजेंद्र मेनन आणि न्यायाधीश व्ही. के. राव यांच्या पीठाने सरकारच्या धोरणात्मक बाबीत हस्तक्षेपास नकार दिला. या निर्णयाशी आणखी काही मोठे आर्थिक मुद्दे निगडित असतात, असे न्यायालयाने म्हटले आहे.

दिल्लीतील डिझायनर पूजा महाजन यांनी इंधन दरवाढीसंदर्भात जनहित याचिका दाखल केली असून, त्यावर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने मत मांडले. इंधनात दररोज होणाऱ्या भाववाढीला याचिकेत आव्हान देण्यात आले आहे. इंधन हे अत्यावश्‍यक सेवेचा भाग मानून पेट्रोल आणि डिझेलचे योग्य भाव निश्‍चित करण्यासाठी सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. ऍड. ए. मैत्री यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आली आहे; परंतु सुनावणी करताना न्यायालयाने इंधन दरवाढीची बाब ही सरकारच्या आर्थिक धोरणाचा भाग आहे, असे नमूद केले. या धोरणावर अनेक आर्थिक मुद्दे जोडले गेलेले असतात. न्यायालयाने या धोरणात्मक बाबींपासून दूर राहायला हवे. सरकारला एखाद्या धोरणात्मक विषयाबाबत निर्देश देता येणार नाहीत, असे उच्च न्यायालयाने सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...
इतिवृत्तात शेतकरी प्रतिनिधींच्या...नांदेड : ऊसदर निश्चित करण्याच्या बाबतीत...
पंतप्रधान दौऱ्याच्या दिनी मनसे वाटणार...यवतमाळ : निवडणुकीपूर्वी अच्छे दिनचे स्वप्न...
जमीन गैरव्यवहार चौकशी 'सक्तवसुली'मार्फत... पुणे : सोलापूरच्या जुनी मिल नावाने ओळखल्या...
उन्हाळी भुईमुगावरील रसशोषक किडींचे...उन्हाळी भुईमुगामध्ये पीक कालावधीत सुरवातीच्या...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ६०० ते २०००...परभणीत ६०० ते १००० रुपये  परभणी...
फुलांना भेट देणाऱ्या किटकांचे डीएनए...किटकांनी फुलांना भेट दिल्यानंतर तिथे सूक्ष्म असे...
रेशीम उत्पादकांचे उपोषण अखेर सुटलेजालना : मनरेगाअंतर्गत मिळणारे पेमेंट...
जळगावात शिक्षकांची 'व्हॉट्‌सॲप'वरून...जळगाव : शाळेत वेळेवर न येणे, वेळेअगोदरच शाळा...
जळगाव जिल्ह्यात `किसान सन्मान`च्या...जळगाव  : केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर...
आरफळची ऊसबिलातून पाणीपट्टी वसूलतासगाव, जि. सांगली : दुष्काळी पार्श्वभूमीवर...
गोंदिया जिल्ह्यात अडीच लाख शेतकऱ्यांना...गोंदिया : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत...